आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sexiest Woman Deepika Padukone Attends The FHM Bash

कतरिनाला मात देत दीपिका ठरली सेक्सी वुमन, पाहा इवेंटचे खास PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री नेहा शर्मा, दीपिका पदुकोण आणि किआरा आडवाणी
मुंबई - दीपिका पदुकोण सध्या भलतीच खुशीत आहे. एकीकडे तीन लागोपाठ हिट सिनेमे देऊन ती बॉलिवूडची नंबर वन अभिनेत्री ठरली तर आता तिच्या सौंदर्याची जादूही चालली आहे. ब्रिटेनमधील FHM या पुरुष लाइफस्टाइल मॅगझिनने दीपिकाची निवड 2014 मधील सर्वात सेक्सी अभिनेत्री म्हणून केली आहे. हा मान गेल्या तीन वर्षांपासून कतरिना कैफला मिळत होता. मात्र यावर्षी दीपिकाने कतरिनाला मात देत हा खिताब आपल्या नावी केला. मुंबईत पार पडलेल्या एका पार्टीत दीपिकाला हा खिताब बहाल करण्यात आला.
FHMने निवडलेल्या 5 सेक्सी बॉलिवूड अभिनेत्री

1. दीपिका पदुकोण
2. कतरीना कैफ
3. प्रियांका चोप्रा
4. नर्गिस फखरी
5. श्रुति हसन
खिताब मिळाल्यानंतर मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत दीपिका म्हणाली, ''ही खूप चांगली सुरुवात आहे. जेव्हा लोक तुम्हाला सेक्सी म्हणतात, तेव्हा यापेक्षा दुसरी चांगली कॉम्प्लिमेंट असूच शकत नाही. माझ्यासाठी सेक्सी या शब्दाचा अर्थ व्यक्तिची पर्सनॅलिटी, तिचा सेन्स ऑफ ह्युमर, आत्मविश्वास आणि इमोशनल, सेंसिटिव्ह असा होतो.''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इवेंटमध्ये दीपिकासह पोहोचलेल्या इतर स्टार्सची छायाचित्रे...