आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ कल्किच नव्हे, या 6 अभिनेत्रीसुद्धा पडल्या आहेत लैंगिक अत्याचाराला बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने गेल्या वर्षी त्याच्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमात बाल लैंगिक शोषणचा मुद्दा उपस्थित केला होता. या शोमध्ये आमिरने अशा लोकांना आमंत्रित केले होते, ज्यांच्यावर बालपणी लैंगिक अत्याचार झाले होते. आमिरच्या या पावलानंतर अनेक लोकांनी हिंमत एकवटून आपल्यासोबत घडलेल्या अत्याचाराविषयी मौन तोडले होते.
बॉलिवूड अभिनेत्री कल्कि कोचलिनने तिच्या आयुष्यातील असेच एक सत्य जगासमोर उघड केले आहे. कल्किने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की तिचे बालपणी लैंगिक शोषण झाले होते. बातचितदरम्यान कल्किने स्पष्ट केले, की याविषयावर ती सार्वजनिकरित्या बोलू इच्छित नाही.
कल्कि म्हणाली, ''याविषयावरचे मौन तोडायला मला अनेक वर्षे लागली. दुःखणे सोबत घेऊन जगताना जीवन कसे जगायचे हे स्वतःचे स्वतः ठरवायचे असते''
कल्कि देव डी, ये जवानी है दीवानी, जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमांमध्ये झळकली आहे.
एखाद्या अभिनेत्रीचे बालपणी लैंगिक शोषण होण्याची ही पहिली घटना नाहीये. यापूर्वी काही अभिनेत्रींनी उघड केले होते, की त्यांचा बालपणी लैगिंक छळ झाला आहे. यामध्ये अभिनेत्री तब्बू, राजेश खन्ना यांची लिव्ह इन पार्टनर अनिता अडवाणी, अभिनेत्री सोफिया हयात, प्रसिद्ध सतारवादक पंडित रविशंकर यांची कन्या अनुष्का, हॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माती ओप्रा विन्फ्रे, पॉप सिंगर मॅडोना यांचे नाव सामील आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या अभिनेत्रींविषयी..