आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

64 वर्षांच्या झाल्या शबाना आझमी, पाहा Rare Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री रेखासोबत शबाना आझमी)

प्रसिद्ध शायर आणि गीतकार कैफी आझमी यांच्या घरी 18 सप्टेंर 1950 रोजी हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांचा जन्म झाला. सुरुवातीपासूनच शबाना आधुनिक विचारसरणीच्या आहेत. 'सूमन' या सिनेमात जया बच्चन यांच्या अभिनयाने प्रेरित होऊन त्यांनी अॅक्टिंग अँड टेलिव्हिजिन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात प्रवेश घेतला.
1973मध्ये अॅक्टिंगचा डिप्लोमा प्राप्त केल्यानंतर दिवंगत अहमद अब्बास यांनी त्यांना 'फासला' या सिनेमासाठी साइन केले. मात्र शबाना यांचा रिलीज झालेला पहिला सिनेमा 'अंकूर' हा होता. या सिनेमाचे समीक्षकांनी भरभरुन कौतुक केले होते. या सिनेमातील उत्कृष्ट अभिनयासाठी शबाना यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
आत्तापर्यंत शबाना यांना 'अर्थ', 'खंडहर', 'पार' आणि 'गॉडमदर'सह पाच सिनेमांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. कमर्शिअल सिनेमांमध्येसु्द्धा शबाना यांनी आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. 'निशांत', 'जूनून', 'शतरंज के खिलाडी', 'स्पर्श', 'पार', 'अर्थ', 'अमर-अकबर-अँथोनी', 'परवरिश', 'ज्वालामुखी', 'फकीरा' हे शबाना यांचे निवडक गाजलेले सिनेमे आहेत. त्यांचा 'फायर' हा सिनेमासुद्धा बराच गाजला होता.
आज शबाना आझमी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांची दुर्मिळ छायाचित्रे दाखवत आहोत. यामध्ये काही छायाचित्रे ही त्यांच्या खासगी आयुष्यातील तर काही सिनेमांमधील आहे.