आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाज शरीफ आहेत रफी, लता व कैफींचे चाहते...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीमध्ये सज्जन जिंदल यांच्या घरी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमात शबाना आझमींची भेट पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी झाली. यादरम्यान दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. या भेटीबाबत शबाना यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, 'नवाझ साहेब बॉलिवूडचे मोठे चाहते आहेत. खासकरुन माझे वडील कैफी आझमी, लता मंगेशकर आणि मोहंमद रफींचे ते चाहते आहेत. त्यांनी माझ्याकडे दिलीप कुमार, अमिताभ बच्चन यांचीदेखील विचारपूस केली.'
नवाझ शरीफ यांनी शबाना आणि त्यांचे पती जावेद अख्तर यांना पाकिस्तानला येण्याचे निमंत्रण दिले आहे. सोबतच लतादीदी आणि बच्चन साहेबांना कोणत्या निमित्ताने पाकिस्तानला बोलावता येईल, हे विचारले.
शबाना पुढे म्हणाल्या की, भारत आणि पाकिस्तानदरम्यान चित्रपटांच्या माध्यमातून कशाप्रकारे सौहार्दपूर्ण संबंध बनवता येतील, यावरदेखील आमच्यात चर्चा झाली. मी त्यांना दोन्ही देशांसोबत चित्रपट निर्मिती परंपरेची देवाण-घेवाण करण्याचा सल्लाही दिला.'