आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: शबानासाठी जावेद यांनी पहिल्या पत्नीला दिला होता घटस्फोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री शबाना आझमी आणि पती जावेद अख्तर)
मुंबई: बॉलिवूडमध्ये 'अंकुर' (1974) सिनेमातून पदार्पण करणा-या अभिनेत्री शबामा आझमी आज 64 वर्षांच्या झाल्या आहेत. पाचवेळा उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नॅशनल अवॉर्ड आणि चारवेळा फिल्मफेअर अवॉर्ड जिंकल्याने शबाना यांना फिल्मी करिअरमध्ये सर्वात मोठी ओळख मिळाली होती. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर कधी-मधी सिनेमांत झळकणा-या शबाना 70, 80 आणि 90च्या दशकात बॉलिवूडमध्ये प्रसिध्द झाल्या. सिनेमांमध्ये येण्यापूर्वी सायकॉलॉजीमध्ये शिक्षण पूर्ण करून डिग्री मिळवणा-या शबाना यांनी '24' या टीव्ही शोमध्ये काम केले.
तसे पाहाता, शबाना यांची ओळख गीतकार जावेद अख्तर यांची पत्नी म्हणूनसुध्दा होते. जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांची जोडी बॉलिवूडमधील खास जोड्यांमध्ये मोजली जाते. पण लग्नापूर्वी शबाना यांचे नाव दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याशी जोडलेले होते. शबाना यांनी जेव्हा जावेदसोबत लग्न करण्याविषयी आई-वडिलांना विचारले तेव्हा लग्नाला नकार दिला होता. त्यांच्या मते, जावेद विवाहित असून त्यांना दोन मुलेही होती. मात्र, जावेद यांनी शबाना यांच्यासाठी पहिली पत्नी हनी ईराणीला घटस्फोट दिला.
अभिनयासाठी प्रत्येक भूमिका साकारली
अभिनेत्री तब्बू शबाना आझमी यांची भाची आहे, हे खूप कमी लोकांना ठाऊक आहे. शबाना यांना स्वत:चे मुल नाहीये. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या दातांची प्रत्येकजण खिल्ली उडवत होते. परंतु महेश भट्ट धीर दिला होता. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत शबाना अशा अभिनेत्रींमध्ये सामील आहेत, ज्यांनी 'वाटर' सिनेमासाठी मुंडन केले होते. एवढेच काय, समलैंगिकतावर आधारित 'फायर' या सिनेमात त्यांनी नंदिता दाससोबत अनेक बोल्ड सीन्स दिले होते.
नरेंद्र मोदी यांचा केला विरोध
शबाना आझमी यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. शबाना म्हणाल्या होत्या, की गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर गोध्रा हत्‍याकांडचा आरोप होता आणि अमेरिकेने त्यांना व्हिसा देण्यासुध्दा नकार दिला होता. अशावेळी ते देशाचे पंतप्रधान कसे होऊ शकतात?
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शबाना आझमी यांची छायाचित्रे...