आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Day For Shahrukh Whose 1994 DDLJ Celebrating 1,000 Weeks

शाहरुख-काजोल एकत्र, \'DDLJ\'ला 1000 आठवडे पूर्ण झाल्याचा आनंद, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('DDLJ'च्या सेलिब्रेशनवेळी शाहरुख खान आणि काजोल)
मुंबईः यशराज स्टुडिओत अलीकडेच एका खास सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. 1995 मध्ये रिलीज झालेल्या आणि सुपरहिट ठरलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमाला तब्बल 1000 आठवडे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे सेलिब्रेशन ठेवण्यात आले होते. यावेळी शाहरुख अगदी राजच्या अंदाजात स्टेजवर अवतरला. तर काजोलचाही हटके अंदाज यावेळी उपस्थितांना पाहायला मिळाला.
यावेळी 'DDLJ'च्या राज आणि सिमरनप्रमाणे शाहरुख-काजोलने स्टेजवर रोमँटिक परफॉर्मन्स देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यावेळी दोघांनीही शूटिंगच्या आठवणींना उजाळा दिला.
मी 'DDLJ'च्या अनुपम खेरसारखा नाही...
शाहरुख खानने मीडियाशी बोलताना सांगितले, की तो वडील म्हणून 'DDLJ'च्या अनुपम खेर यांच्याप्रमाणे मुळीच नाहीये. अनुपम खेर यांनी सिनेमात शाहरुखच्या वडिलांची भूमिका साकारली होती. यावेळी शाहरुखला त्याच्या वडिलांची आठवण झाली. त्याचे वडील त्याला मित्राप्रमाणे होते, असे शाहरुखने यावेळी सांगितले.
शाहरुख मेहनती व्यक्ती आहे...
काजोलने यावेळी शाहरुखचे कौतुक करताना म्हटले, की तो खूप मेहनती आहे. शिवाय करण जोहरविषयी तिने सांगितले, की त्याने शूटिंगवेळी तिची हेअरस्टाईल केली होती.
काजोलच्या हातात दारुची बाटली बघून नाराज झाले होते यश चोप्रा...
काजोल 'DDLJ'मध्ये एका दृश्यात मद्यप्राशन करताना दिसते. यावेळी तिच्या हातात दारुची बाटली बघून यश चोप्रा नाराज झाले होते. ही गोष्ट काजोलने सिनेमाला 1000 आठवडे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित सेलिब्रेशनवेळी शेअर केली.
मुलीवर जीवापाड प्रेम करतो शाहरुख...
'DDLJ'ला 1000 आठवडे पूर्ण झाल्याच्या निमित्तान आयोजित कार्यक्रमात शाहरुखने मीडियाला सांगितले, की त्याचे मुलगी सुहानावर जीवापाड प्रेम आहे. शाहरुख म्हणाला, "मुलगा आर्यनपेक्षा मला सुहानाची खूप काळजी वाटते."
आदित्यने बनवले मला स्टार...
शाहरुख म्हणाला, की आदित्यने मला सुपरस्टार बनवले, तो माझा खूप चांगला मित्र आहे.
थंडीमुळे घातले होते जॅकेट...
शाहरुखने 'DDLJ'च्या एका दृश्यात (ज्यामध्ये शाहरुख काजोलला म्हणतो, की माझे तुझ्यावर प्रेम आहे) एक लेदर जॅकेट घातले होते. ते खूप लोकप्रियसुद्धा ठरले होते. याविषयी शाहरुखने सांगितले, की त्यावेळी त्याला खूप थंडी वाजत होती. त्यामुळे त्याने आदित्यचे जॅकेट घातले होते. शूटिंग संपल्यानंतर आदित्यने त्याच्याकडून जॅकेट परत घेतले होते.
'पलट...' सीन आहे शाहरुखचा आवडता सीन...
सिनेमातील प्रत्येक दृश्य अविस्मरणीय आहे. मात्र 'पलट...' हा माझा आवडता सीन असल्याचे शाहरुख यावेळी म्हणाला. या सिनेमातील 'मैं नहीं आऊंगा...' हा माझा आवडता डायलॉग असून त्यासाठी बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड मिळावा, अशी माझी इच्छा होती, असे शाहरुखने सांगितले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'DDLJ'ला 1000 आठवडे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित सेलिब्रेशनची छायाचित्रे...