आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan And Kajol To Come Together For Rohit Shetty's Next

शाहरुख-काजोलचा पुन्हा दिसू शकतो ऑनस्क्रिन रोमान्स, पाहा मागील सिनेमांतील Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बाजीगर'च्या एका सीनमध्ये शाहरुख खान आणि काजोल)

मुंबई:
शाहरुख खान आणि काजोल देवगण यांची ऑनस्क्रिन जोडी बॉलिवूडमधील सर्वात जास्त रोमँटिक जोडी मानले जाते. त्यांचे चाहतेदेखील तेवढेच आहेत. एकेकाळी प्रत्येकाला या जोडीचा ऑनस्क्रिन रोमान्स पाहण्याची उत्सूकता असायची. कदाचित आजही ही उत्सूकता कायम असेल.
आता दोघांचा ऑनस्क्रिन रोमान्स पाहण्याची तुमची इच्छा दिग्दर्शक रोहित शेट्टी पूर्ण करणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. कारण बॉलिवूड वर्तूळात अशी चर्चा रंगली आहे, की शाहरुख आणि काजोल या जोडीला घेऊन रोहित आगामी सिनेमाची योजना करत आहे.
रोहितच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'सिंघम रिटर्न्स'ला बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे. सिनेमात 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. सूत्रांच्या सांगण्याप्रमाणे रोहित त्याच्या आगामी सिनेमात शाहरुखला कास्ट करणार असून त्यात काजोल मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. सर्वकाही जुळून आले तर ही ऑनस्क्रिन रोमँटिक जोडी तुम्हाला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसू शकते. सिनेमाचे प्री-प्रॉडक्शन काम सुरु झाले आहे. लवकरच सिनेमाची औपचारिक घोषणा केली जाणार आहे.
रोहित सिनेमाचा क्लायमॅक्स तयार करत आहे. असे म्हटले जात आहे, की सिनेमाचे शूटिंग पुढील वर्षी सुरु होणार आहे. शाहरुखसह रोहितने मागील वर्षी 'चेन्नई एक्स्प्रेस' बनवला होता. शाहरुख आणि काजोल यांनी आतापर्यंत 6 सिनेमे केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या जोडीची मागील सिनेमांतील रोमँटिक छायाचित्रे...