मुंबईः अभिनेता
सलमान खानला त्याची लाडकी बहीण अर्पिताचे लग्न खूप खास बनवायचे आहे. यासाठी तो स्वतः प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतोय. लग्नापूर्वी त्याच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी म्हणजे, अभिनेता
शाहरुख खान या लग्नाला हजेरी लावणार आहे.
सलमानने शाहरुखला
आपल्या बहिणीच्या लग्नाचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे शाहरुख त्याचे निमंत्रण स्वीकारुन या लग्नाला हजेरी लावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता शाहरुख या लग्नात सहभागी होणार हे स्पष्ट झाले आहे.
याविषयी शाहरुख म्हणाला, "होय, मी अर्पिताच्या लग्नात सहभागी होणार आहे. अर्पिता खूप लहान होती, तेव्हापासून मी तिला ओळखतो. सलमानचे कुटुंब मला माझ्या कुटुंबाप्रमाणे आहे. या कुटुंबावर माझे प्रेम असून मी सर्वांचा सन्मान करतो."
एकुणच अर्पिताच्या लग्नाला शाहरुखची हजेरी हे सलमानसोबतच्या त्याच्या नात्याची नवीन सुरुवात म्हणायला हरकत नाही.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या कसे सुधारत चालले आहे शाहरुख-सलमानचे नाते...