मुंबई: बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा
शाहरुख खान 3660 कोटी रुपयांचा मालमत्तेचा मालक असून तो भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामील झाला आहे. एका वेल्थ रिसर्च फर्म वेल्थ-एक्सने सर्व्हेदरम्यान शाहरुखचे नाव भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असल्याचे संगितले आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांकावर मुकेश अंबानी (5,21,550 कोटी रुपये) आणि दुस-या क्रमांकावर लक्ष्मी निवास मित्तल (1,04,920 कोटी रुपये) आहेत. पहिल्यांदा एखाद्या अभिनेत्याचे नाव या यादीत सामील झाले आहे.
शाहरुख खान फिल्म प्रॉडक्शन कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेन्ट, स्पेशल इफेक्ट कंपनी रेड चिलीज वीएफएक्स आयपीएल क्रिकेट टीम कोलकाता नाइट रायडर्स आणि चिल्ड्रेन एज्युटेनमेन्ट पार्क जिडजानिया, मुंबई यांचा मालक आहे. शिवाय, त्याची मुंबई, दुबई आणि लंडनमध्येसुध्दा प्रॉपर्टी आहे. याव्यतिरिक्त अनेक देशी आणि परदेशी ब्राँड्सच्या जाहिरातींसाठीसुध्दा त्याला ओळखले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहरुखच्या मुंबई आणि दुबईमधील आलीशान घराची छायाचित्रे...सोबतच, पाहा दुबईमधील बंगल्याविषयी सांगण्यात आलेला व्हिडिओ...