आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Clicked At Manali Jagtap’S Wedding Reception

डिझायनरच्या रिसेप्शनमध्ये पोहोचला शाहरुख, वर-वधूसोबत घेतली Selfie

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः शाहरुख खान मनाली जगताप आणि विक्की शूरसोबत)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान बुधवारी विक्की शूर आणि मनाली जगताप यांच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये सहभागी झाला होता. मुंबईत हे रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी शाहरुख फॉर्मल लूकमध्ये दिसला. त्याने व्हाइट शर्ट आणि ब्लॅक पँट परिधान केले होते. सोबत मॅचिंग वेस्टकोट घातले होते. विक्की आणि मनालीसोबत त्याने फोटोदेखील काढून घेतले. यावेळी विक्कीने शाहरुखसोबत एक सेल्फीसुद्धा घेतली. रिसेप्शनमध्ये राजकारणातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
मनाली जगतापच्या आईवडिलांनीसुद्धा यावेळी शाहरुखसोबत फोटो काढून घेतले. मनाली प्रसिद्ध ग्राफिक्स डिझायनर आणि फाइन आर्टिस्ट आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा विक्की शूर आणि मनाली जगताप यांच्या वेडिंग रिसेप्शनची खास छायाचित्रे...