आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Completes 22 Years In Bollywood, Says Hasn’T Seen ‘Deewana’ Yet

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहरुखने बॉलिवूडमध्ये पूर्ण केली 22 वर्षे, 33 छायाचित्रांमध्ये पाहा किंग खानचा प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'दीवाना' सिनेमातील एका दृश्यात शाहरुख आणि दिव्या भारती. 1992 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाद्वारे शाहरुखने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
मुंबई - 26 जून 1992 रोजी बॉलिवूडच्या किंग खान शाहरुखने 'कोई ना कोई चाहिए...' या गाण्याद्वारे सिल्व्हर स्क्रिनवर धमाकेदार एन्ट्री घेतली आणि आपल्या अभिनयाच्या बळावर चाहत्यांची फौज निर्माण केली. बॉलिवूडच्या किंग खानचा प्रवास 26 जूनपासून 'दीवाना' या सिनेमाद्वारे सुरु झाला होता. 'दीवाना' हा शाहरुखचा पदार्पणातला पहिला सिनेमा आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. 'दीवाना'नंतर याच वर्षी शाहरुखचे 'चमत्कार', 'दिल आशना है' आणि 'राजू बन गया जेन्टलमॅन' हे तीन सिनेमे रिलीज झाले.
शाहरुखने बॉलिवूडमध्ये 22 वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने ट्विट केले, ''धन्यावद 22 वर्षांसाठी''. त्याने आपल्या आणखी एका ट्विटमध्ये म्हटले, ''मी आजपर्यंत 'दीवाना' हा सिनेमा पाहिला नाही. मी निश्चय केला आहे, की मी माझा पहिला आणि शेवटचा सिनेमा बघणार नाही. हे बुकएंड असेल, तर कहाणी मध्ये असेल.''
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी शाहरुखने छोट्या पडद्याद्वारे अभिनयाला सुरुवात केली. 'फौजी' आणि 'सर्कस' या मालिकांमध्ये शाहरुख झळकला होता. शाहरुख आज बॉलिवूडवर अधिराज्य गाजवतोय. मात्र त्याचा हा प्रवास संघर्षमय होता. शाहरुखने मुंबईत बरेच दिवस संघर्ष केला. 1985 मध्ये दिल्लीतील हंसराज कॉलेजमधून इकॉनॉमिक्समध्ये पदवीप्राप्त केल्यानंतर शाहरुखने जामिया इस्लामिया कॉलेजमधून मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर डिग्री मिळवली. यादरम्यान त्याने अॅक्शन थिएटर ग्रुपमध्ये सहभागी घेतला. शाहरुखच्या वयाच्या 15व्या वर्षी कॅन्सरमुळे त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर 1990 मध्ये त्याच्या आईनेसुद्धा जगाचा निरोप घेतला. आईच्या निधनानंतर शाहरुख 1991 मध्य् मुंबईत दाखल झाला आणि आपल्या संघर्षाच्या दिवसाला सुरुवात केली.
1993 ते 1994पर्यंत अॅण्टी हीरोची प्रतिमा...
शाहरुखला त्याचे चाहते रोमँटिक हीरोच्या रुपात ओळखतात. मात्र बॉलिवूडमध्ये करिअरच्या सुरुवातीच्या काळात शाहरुखने 'बाजीगर' आणि 'डर' या सिनेमाद्वारे अॅण्टी हीरोच्या रुपात स्वतःला प्रस्थापित केले. या दोन्ही सिनेमांतील शाहरुखच्या भूमिका वाखाणल्या गेल्या. 'डर' या सिनेमाद्वारे शाहरुख यशराज फिल्म्ससोबत जोडला गेला. 1994 मध्ये शाहरुखचा आणखी एक सिनेमा आला 'कभी हां कभी ना'. कुंदन शाह यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. यानंतर शाहरुखचा माथेफिरू प्रियकराची भूमिका असलेला 'अंजाम' सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा फारसा गाजला नाही. मात्र शाहरुखचा प्रवास सुरु राहिला. या सिनेमासाठी शाहरुखला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला.
1995 मध्ये शाहरुख बनला रोमँटिक हीरो...
करिअरच्या सुरुवातीच्या तीन वर्षांत अॅण्टी हीरोच्या भूमिकेत झळकलेल्या शाहरुखसाठी 1995 हे वर्ष खूप महत्त्वाचे ठरले. यावर्षी शाहरुखने राकेश रोशन यांच्या 'करण-अर्जुन' आणि आदित्य चोप्राच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमांत काम केले. दोन्ही सिनेमात शाहरुख रोमँटिक हीरोच्या भूमिकेत झळकला. हे दोन्ही सिनेमे सुपरडुपर हिट ठरले होते. येथून शाहरुखचा यशस्वी प्रवास ख-या अर्थाने सुरु झाला आणि इंडस्ट्रीत निगेटीव्ह भूमिकेत झळकणारा शाहरुख रोमँटिक हीरो म्हणून नावाजला गेला.
पुढील स्लाईड्मध्ये 32 छायाचित्रांमध्ये शाहरुखचा 22 वर्षांचा फिल्मी प्रवास...