आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Completes Hrithik’S ‘Bang Bang Dare’

हृतिकच्या चॅलेंजला शाहरुखने दिले प्रत्यूत्तर, पाहा असे बनवले 8 पॅक अॅब्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(व्यायाम करताना शाहरुख खान)
मुंबईः अभिनेता हृतिक रोशन आपल्या आगामी 'बँग बँग' या सिनेमाचे प्रमोशन हटके अंदाजात करतोय. तो बी टाऊनमधील इतर सेलिब्रिटींना 'बँग बँग डेअर' चॅलेंज देतोय. अलीकडेच त्याचे हे चॅलेंज अभिनेत्री प्रियांका चोप्राने स्वीकारले होते. आता शाहरुख खानने हृतिकचे हे चॅलेंज स्वीकारले आहे.
'बँग बँग डेअर' चॅलेंज अंतर्गत हृतिकने शाहरुखला आपली बेस्ट अॅब एक्सरसाइट छायाचित्रे दाखवण्यासाठी सांगितले. मात्र शाहरुखने केवळ छायाचित्रेच नव्हे तर स्वतःचा एक व्हिडिओसुद्धा अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख हृतिकचे चॅलेंज स्वीकारत आपल्या व्यायामाविषयी सांगताना दिसतोय.
शाहरुख नेहमीच काहीतरी हटके करण्यासाठी ओळखला जातो. असेच हटके काम त्याने यावेळीसुद्धा केले आहे. हृतिकने केवळ छायाचित्रांचे चॅलेंज दिले होते, मात्र शाहरुखने पूर्ण व्हिडिओच अपलोड केला आहे. शाहरुखचे एट पॅक अॅब्स त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. आगामी 'हॅपी न्यू इयर' या सिनेमात शाहरुख एट पॅक अॅब्समध्ये दिसणार आहे. व्हिडिओच्या शेवटी शाहरुखने एक मेसेज पोस्ट केला आहे, त्यावर लिहिले, ""डुग्गू (हृतिक रोशन) आशा आहे, तुझ्या 'GNAB GNAB' (BANG BANG चे स्पेलिंग उलटे लिहिले) अपेक्षेप्रमाणे हे चॅलेंज पूर्ण झाले असावे.!''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शाहरुखच्या व्यायामाची छायाचित्रे आणि शेवटच्या स्लाईडमध्ये पाहा शाहरुखचा व्हिडिओ...