आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Gifted Salman’S Sister A Very Expensive Gift Hamper

शाहरुखने सलमानच्या बहिणीला भेट दिली इंटरनॅशनल ब्रँडची हँडबॅग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अर्पिताच्या संगीत सेरेमनीदरम्यान शाहरुख आणि सलमान)
मुंबई- शाहरुख खान काल (17 नोव्हेंबर) सलमानची बहीण अर्पिताच्या संगीत सेरेमनीमध्ये पोहोचला होता. यावेळी त्याने अर्पिताला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. परंतु शाहरुखने अर्पिताला लग्नात काय भेटवस्तू दिली हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सूकता लागली आहे. सूत्राच्या सांगण्याप्रमाणे, शाहरुखने अर्पिताला खूप महागडी डिझाइनर बॅग गिफ्ट केली आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'अर्पिताला डिझाइन बॅग्स खूप आवडतात आणि शाहरुखने तिला लेटेस्ट इंटरनॅशनल ब्रँडची बॅग गिफ्ट केली आहे.' सांगितले जाते, की शाहरुख अर्पिताच्या संगीत सेरेमनीमध्ये शाहरुख रात्री पोहोचला आणि सकाळी 6 वाजेपर्यंत तिथेच राहिला. त्यावेळी त्याने सलमानच्या कुटुबीयांशी बातचीत केली.
सूत्रांनी सांगितले, 'शाहरुखने सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्यासोबत बराच वेळ गप्पा मारल्या. सर्वांचा शाहरुखसोबत बरीच जवळीक वाढल्याचे दिसून आले. शाहरुख आणि सलमान यांच्यात वाद झालेला होता असे चित्र दिसून येत नव्हते. दोघेही यावेळी हसताना आणि आनंदी दिसले.'
सांगितले जात आहे, की अर्पिताने शाहरुखला आपल्या लग्नात सहभागी होण्यासाठी हैदराबादला बोलावले आहे.