आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Gifts Farah Khan A Mercedez Benz GL Class SUV

शाहरुखने फराहला गिफ्ट केली मर्सिडीज बेंज GL-Class SUV

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या गेल्या वर्षी रिलीज झालेल्या चेन्नई एक्स्प्रेस या सिनेमाने 400 कोटींचा व्यवसाय केला होता. हा सिनेमा रोहित शेट्टीने दिग्दर्शित केला होता. आता शाहरुख आपल्या आगामी `हॅप्पी न्यू इअर` या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे. हा सिनेमा फराह खान दिग्दर्शित करत आहे. 23 ऑक्टोबर 2014 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. शाहरुख आणि फराह खानच्या मैत्रीबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे. शाहरुखने आपल्या या खास मैत्रिणीला एक मर्सिडीज गाडी गिफ्ट केलीय. मर्सिडीज बेंज GL-Class SUV ही ती गाडी आहे. दिल्ली शोरुममध्ये या गाडीची किंमत 77.5 लाख इतकी आहे.
फराहने आपला हा आनंद ट्विटरवरुन व्यक्त केला आहे. तिने एक छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केले आहे. या छायाचित्रात फराह मर्सिडीज आणि शाहरुखसोबत दिसत आहे. या छायाचित्रासह फराहने ट्विट केले, “Look what I got!!!! Thaaaank u iamsrk ... Touched n beyond..”।
शाहरुखने याआधी फराहसोबत `मैं हूँ ना` आणि `ओम शांति ओम` यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. मैं हू ना रिलीजनंतर शाहरुखने फराहला हुंडई टॅरेंस आणि ओम शांति ओमच्या रिलीजवेळी मर्सिडीज कार गिफ्ट केली होती. या जोडीचा तिसरा सिनेमा `हॅप्पी न्यू इअर` लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे, याही वेळेस शाहरुखने फराहला तिसरी गाडी गिफ्ट केलीय.
'हॅप्पी न्यू इअर' या सिनेमात शाहरुखसोबत अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण, सोनू सूद, विवान शाह आणि बोमन इरानी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर वाचा 'हॅप्पी न्यू इयर' विषयी...