आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Launch ‘The Royal Estates By Shah Rukh Khan’ In Dubai

शाहरुखने दुबईत सुरु केला 3,838 कोटींचा रिअल इस्टेट बिझनेस, पाहा PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दुबईत लाँचिंग इवेंटमध्ये शाहरुख खान आणि गौरी खान)
मुंबई - शाहरुख खानचे दुबईसोबत जुने नाते आहे. काही वर्षांपूर्वीच शाहरुखने दुबईतील पाम जुमेराह येथे घर खरेदी केले होते. पाम जुमेराह जगातील सर्वात आलिशान भागांमध्ये गणले जाते. आता ताजी बातमी आहे, की शाहरुखने रिअल इस्टेट बिझनेसमध्ये पदार्पण केले असून दुबईत आपला नवीन प्रोजेक्ट सुरु केला आहे.
'रॉयल इस्टेट बाय शाहरुख खान' हे शाहरुखच्या नवीन प्रोजेक्टचे नाव असून तो आणि त्याची पत्नी गौरी या रॉयल प्रोजेक्टच्या लाँचिंगसाठी अलीकडेच दुबईत पोहोचले होते. येथे हे दोघेही रॉयल अंदाजमध्ये दिसले. लेमोजिन कारने दोघे कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते.
बुधवारी रात्री शाहरुख आणि गौरीने दुबईतील मदीनत जुमेराहमध्ये आपला नवीन प्रोजेक्ट लाँच केला. यासाठी शाहरुखने तब्बल 3,838 कोटींची गुंतवणूक केली आहे. या प्रोजेक्टअंतर्गत शाहरुख दुबईतील इन्व्हेस्टमेंट पार्कमध्ये 23 लाख चौरसफुटात हाऊसिंग कम्युनिटी डेव्हलप करणार आहे.
या प्रोजेक्टमधील घरांचे इंटेरिअर शाहरुखची पत्नी गौरीने डिझाइन केले आहेत. लॉस एंजिलिस येथील आर्किटेक्ट टोनी अशाई यांनी हा संपूर्ण प्रोजेक्ट डिझाइन केला आहे. या लाँचिंग इव्हेंटमध्ये भारतासह पाकिस्तान, कॅनडा आणि युकेतील लोक सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा लाँचिंग इवेंटची खास छायाचित्रे...