आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Launches 'Happy New Year' Trailer

PICS: 'हॅप्पी न्यू इअर'च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये शाहरुखसह दिसले स्टारकास्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शेखर रवजानी, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, शाहरुख खान, फराह खान, सोनू सुद, बोमन इराणी आणि विवान शाह)
मुंबई: यावर्षीचा बहुचर्चित 'हॅप्पी न्यू इअर'चा ट्रेलर गुरुवारी (14 ऑगस्ट) सुपरस्टार शाहरुख खानने लाँच केला. या सिनेमात काम करणारे सर्व कलाकार यादरम्यान उपस्थित होते. सिनेमाची दिग्दर्शिका फराह खानसुध्दा इव्हेंटमध्ये दिसली.
या इव्हेंटला खास बनवण्यासाठी देशभक्ती थीमवरी डान्सने सुरुवात झाली. या स्टार्सनी लाँचिंग इव्हेंटमध्ये खास जॅकेट घातलेले होते. त्यावर इंग्रजीतून एक-एक शब्द लिहिलेला होता. हे सर्व स्टार्स एका रांगेत उभे राहिल्यानंतर जॅकेटवर 'INDIAWAALE' असे दिसून आले. सिनेमात शाहरुखसह काम करणारे अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण, जॅकी श्रॉफ, बोमन इराणी, सोनू सुद, विवान शाह यांच्यासोबतच म्यूझिक कंपोझर विशाल-शेखरसुध्दा उपस्थित होते. लाँचिंगनंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
'हॅप्पी न्यू इअर'मध्ये शाहरुखच्या पात्राचे नाव चार्ली असून दीपिकाच्या मोहिनी अभिषेकच्या नंदू भिडे, सोनूच्या जग, बोमन यांच्या टमी आणि विवानच्या रोहन अशी नावे आहेत. हा सिनेमा येत्या 24 ऑक्टोबरला रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'हॅप्पी न्यू इअर'च्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटची छायाचित्रे...