आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shah Rukh Khan To Do A Cameo In Nagesh Kukunoor\'s Marathi Film Dhanak

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता किंग खानची होणार मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री, या बॉलिवूड स्टार्सचेही घडले मराठीत दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान)
मुंबई - बॉलिवूड सेलिब्रिटींना आता मराठीचे वेध लागले आहेत. 'लय भारी' या सिनेमाद्वारे हिंदीतील विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या रितेश देशमुखने मराठी सिनेसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. त्याच्या या सिनेमात सुपरस्टार सलमान खानचेही दर्शन घडले. इतकेच नाही तर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननेसुद्धा मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा अलीकडेच व्यक्त केली होती. आता किंग खान शाहरुखसुद्धा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याची बातमी आहे.
दिग्दर्शक नागेश कुकुनूरच्या आगामी 'धनक' या सिनेमात शाहरुख खानचे दर्शन घडणार आहे.
या सिनेमाशी निगडीत एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखने आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत या सिनेमासाठी तारखा दिल्या आहेत. या सिनेमातील काही भाग शाहरुख स्वतः शूट करणार असून उर्वरित भाग बॉडी डबलच्या साहाय्याने शूट करण्यात येणार आहेत. सूत्राने हेदेखील सांगितले, की शाहरुखने त्याच्या भागाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या सिनेमात शाहरुख स्वतःच्याच भूमिकेत झळकणार आहे.
पुढे वाचा, हुमा कुरैशी आणि टिस्का चोप्राचेसुद्धा होणार आहे मराठीत पदार्पण...