आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Transforms Production House Into A Studio

शाहरुख खानच्या प्रॉडक्शन हाऊसचे फिल्म स्टुडिओमध्ये रुपांतर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : शाहरुख खानचे रेड चिलीज एन्टरटेन्मेंट हे प्रॉडक्शन हाऊस आता भव्य फिल्म स्टुडिओमध्ये रुपांतरित होत आहे. अत्यंत अद्ययावत व सर्व अत्याधुनिक साधनांनी युक्त असे स्वरुप या स्टुडिओचे असणार असून आता वर्षभरात अनेक सिनेमांची निर्मिती आणि चित्रीकरण केले जाणार आहे.
विशेष म्हणजे या स्टुडिओमध्ये शाहरुख खानची भूमिका नसलेल्या सिनेमांच्या चित्रीकरणास आणि निर्मितीसही वाव दिला जाणार आहे. या स्टुडिओ उभारण्यामागे अभिनेता आणि रेड चिलीजचा सीइओ वेंकी मैसूर यांची संकल्पना असून काही दिवसांपूर्वीच या स्टुडिओच्या कामकाजाकरता तसेच या स्टुडिओतून निर्मिती केल्या जाणा-या चित्रपटांच्या वितरणविषयक धोरणांकरता गौरव वर्मा यांची मुख्य महसूल अधिकारी (चीफ रेव्हेन्यू ऑफिसर) नेमणूक केली गेली आहे. गौरव वर्मा याआधी डिस्ने युटिव्हीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहत होते. त्याआधी पीव्हीआर पिक्चर्सतर्फे त्यांनी गेल्या सात वर्षात राजनीती, पान सिंग तोमर, देल्ली बेली, बर्फी व शाहरुख खानची भूमिका असलेल्या चेन्नई एक्सप्रेसचे वितरक प्रमुख म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे आता रेड चिलीजमधून शाहरुख अभिनीत सिनेमांव्यतिरिक्तही इतर सिनेमांची निर्मिती कशी होते याबाबत उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.
याआधी नुकतेच राकेश रोशन यांच्या ‘क्रिश 3’ या बिग बजेट चित्रपटाचे तांत्रिक काम रेड चिलीज प्रोडक्शन हाऊसमध्ये झाले होते. त्यामुळे प्रेक्षकांसाठी आता रेड चिलीजने स्टुडिओद्वारे सिनेमांसाठी एक नवा पर्याय खुला केला आहे.
पुढे वाचा, अनुराग कश्यपच्या सिनेमात झळकणार शाहरुख...