आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखचा मित्र मोरानीच्या घराबाहेर फायरिंग, किंग खानच्या सुरक्षेत वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो:शाहरुख खान)
मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा बिझनेस पार्टनर आणि मित्र अली मोरानीला अंडरवर्ल्डकडून धमकीचे फोन कॉल्स आलेत. त्यानंतर मुंबई पोलिसांनी शाहरुख खानची सुरक्षा वाढवली. अडरवर्ल्ड डॉन रवि पुजारीने अली मोरानी यांना पैशाची मागणी करून धमकी दिली. शनिवारी (23 ऑगस्ट) मोरानी यांच्या जुहू परिसरातील बंगल्याबाहेर काही अज्ञात व्यक्तींनी फायरिंगसुध्दा केली.
पोलिसांच्या मते, मोरानी यांना भिती दाखवण्यासाठी अडरवर्ल्डच्या लोकांनी ही फायरिंग केली असावी. मुंबई पोलिसांना संशय आहे, की मोरानीनंतर अंडरवर्ल्डचा निशाणा शाहरुखवर असू शकतो. म्हणून त्याची पोलिस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
रवि पुजारीने यापूर्वीसध्दा बॉलिवूड कलाकारांना धमकीचे फोन कॉल्स केले होते. मुंबईच्या क्राइम ब्रांचच्या एका अधिका-याने सांगितले, की मोरानी शाहरुखचा जवळचा मित्र आहे. म्हणून रवि पुजारी शाहरुखला आपला पुढचा निशाणा बनवू शकतो. त्यामुळे आम्ही त्याची सुरक्षा वाढवून दोन पोलिस कर्मचा-यांना तैणात केले आहे.
शाहरुखच्या एका जवळच्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार, पुजारी लोकप्रियता मिळवण्यासाठी बॉलिवूड कलाकारांना धमकी देतो.