आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan’S Son Aryan Ready For His Debut Film

लवकरच बॉलिवूडमध्ये होणार शाहरुखच्या मुलाची एंट्री, जाणून घ्या कोण करणार लाँच?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आर्यन खान)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान आपल्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे. आर्यनला आपल्या सिनेमात लाँच करण्यासाठी आदित्य चोप्रा प्लानिंग करत आहे.
इंडस्ट्रीच्या सूत्राच्या सांगण्यानुसार, आर्यन लवकरच आपले शिक्षण पूर्ण करून अभिनयाकडे मोर्चा वळवणार आहे. आर्यनने 'कभी खुशी कभी गम' सिनेमात शाहरुखच्या बालपणीची भूमिका साकारली होती. याकडे पाहून आदित्य आर्यनला आपल्या 'धूम' सीरिजच्या 'धूम 6'च्या माध्यमातून लाँच करणार आहे, असे कळते. या सिनेमाचा शाहरुख सह-निर्माता असेल. मात्र सिनेमा तयार होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागेल. सध्या शाहरुख आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी गंभीर आहे. त्याची इच्छा आहे, की आर्यनने वयाच्या 21व्या वर्षांनंतर फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवावे.
यशराज फिल्म्सशी शाहरुखचे खूप जूने नाते आहे. तसेच, तो दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांच्या खूप क्लोज आहे. जर आर्यन यश फिल्म्समधून आपले पदार्पण करत असेल तर यात आश्चर्यचकित होण्याचे कारणच नाहीये.
लंडनमध्ये घेतोय शिक्षण
शाहरुखचा मुलगा आर्यन सध्या लंडनच्या सेव्हन ओकवर्ड शाळेत शिक्षण घेत आहे. गेल्या दिवसांत आर्यन एक फेक MMSने चर्चेत आला होता. हा फेक MMS सोशल साइट्सवर व्हायरल झाला होता. या व्हिडिओविषयी सांगितले जाते, की MMSमध्ये अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आर्यनसोबत दिसत होती. मात्र हा MMS फेक होता, असेही नंतर सांगण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आर्यनचे आपल्या कुटुंबीयांसोबतची छायाचित्रे...