आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाच्या रुद्रावतारावर शाहरुख म्हणाला, \'माझ्यात एवढे धाडस नाही\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('हॅप्पी न्यू इअर'च्या म्यूझिक लाँचदरम्यान शाहरुख खान)
मुंबई: अलीकडेच, एका इंग्रजी वेबसाइटवर आपल्या क्लीवेजची बातमी पाहून शांत दीपिकाने रुद्रावतार दाखवला. तिला पाठिंबा देण्यासाठी सर्व बॉलिवूड तिच्या पाठिमागे उभे राहिले आहे. रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रानंतर आता बॉलिवूडचा किंग अर्थातच शाहरुख खानने तिला समर्थन दिले आहे.
सोमवारी (15 सप्टेंबर) 'हॅप्पी न्यू इअर' सिनेमाच्या म्यूजिक लाँचिंग इव्हेंटमध्ये पत्रकारांनी या मुद्यावर एसआरकेची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, 'आपण अशा वादांना उत्तेजन देऊ नये. दीपिकाने जे टि्वट केले आहे, मी त्याला पाठिंबा देतो. माझ्यात दीपिकासारखी मुद्दा उचलून धरण्याची हिम्मत नाहीये. मात्र तिला पाठिंबा देऊ शकतो. आम्ही सर्व तिच्यासोबत आहोत.'
याविषयी दीपिकाला विचारल्या असता, तिने सांगितले, 'मला जे सांगायचे होते, ते मी सांगितले. यानंतर असे करण्यापूर्वी लक्षात राहिल असा विश्वास आहे.'
'हॅप्पी न्यू इअर'च्या म्यूझिक लाँचमध्ये काय होते खास?
'हॅप्पी न्यू इअर'च्या म्यूजिक लाँचिंग इव्हेंट यशराज स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी सिनेमा दिग्दर्शिका फराह खान आणि शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, बोमन ईराणी, सोनू सुद आणि विवानसह सर्व स्टारकास्ट उपस्थित होते. टीव्ही स्टार्स ऋत्विक धंजानी आणि कुंवर अमरने इव्हेंट होस्ट केला. यावेळी नीती मोहनने फर्स्ट परफॉर्मन्स दिला. तिने सिनेमातील 'मनवा लागे...' हे गाणे गायले. त्यानंतर सुखविंदर सिंहने 'सटकली' हे गाणे गायले. त्यानंतर सर्वस्टारकास्टनी 'इंडिया वाले'वर परफॉर्मन्स दिला. हा परफॉर्मन्स शानदार ठरला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'हॅप्पी न्यू इअर'च्या म्यूजिक लाँचिंग इव्हेंटची छायाचित्रे...