आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहरूख सलमानमध्ये दुरावा पण ; आवडी सारख्याच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख आणि सलमान खान पूर्वी चांगले मित्र होते; पण त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. एका चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्याच्या मुद्दावरुन त्यांच्यात चांगलीच जुंपली. त्यानंतर कॅटरिनाच्या वाढदिवसावेळी झालेल्या भांडणामुळे दोघांत अबोला आहे.
बॉलीवूडमधील हे दोन दिग्गज कलाकार चुकूनही एकमेकांसमोर येत नाहीत. एखाद्या कार्यक्रमाचे दोघांना आमंत्रण आले तर त्यात एक गेला तर दुसरा जात नाही आणि दोघे गेले तरी त्यांचे नातेवाईक त्यांचा सामना होऊ देत नाहीत. अशा अनेक घटना आहेत यातून कळते की, दोघांचे मार्ग खरचं खूप वेगळे झाले आहेत; पण यांच्या वेगळे झाल्यानंतरही दोघांत काही गोष्टी सारख्या आहेत.
दोघांचीही खेळात आवड आहे. शाहरुख एका क्रिकेट टीमचा मालक आहे, तर सलमान सोहेल खानच्या सेलिब्रिटी क्रिकेट टीमचा प्रमोटिंग स्टार आहे. याच प्रकारे दोघांना फुटबॉल खेळाचीदेखील आवड आहे.
बातमी आहे की, शाहरुख गोआ फुटबॉल क्लब ‘डेम्पो एससी’चे 50 टक्के शेयर्स विकत घेणार आहे. शाहरुखला ही खेळाची आवड आहे आणि यात तो मोठे काहीतरी करण्याची योजना आखत आहे. कॉलेजच्या दिवसांत शाहरुख फुटबॉलचा खेळाडू होता आणि त्याचा मुलगा आर्यनदेखील फुटबॉल खेळतो. सलमानच्या मते, क्रिकेटबरोबरच भारताने फुटबाललादेखील गांर्भीयाने घेतले पाहिजे. अलीकडेच समलमाने एका मुलाखतीत म्हटले होते की, फुटबॉल खेळण्यासाठी फक्त चांगले मैदान आणि एक फुटबॉल हवा असतो; पण भारतात चांगले फुटबॉल मैदाने नाहीत. मी नक्कीच यावर काम करेल, वेळ लागला तरी मी प्रयत्न सुरू ठेवेल.