आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'उडता पंजाब\'मध्ये शाहिदसोबत दिसणार प्रियांका चोप्रा?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाल भारद्वाजचा सहकारी व 'डेढ इश्किया'चा दिग्दर्शक अभिषेक चौबे आपल्या आगामी चित्रपटावर काम करत आहे. 'उडता पंजाब' हे या चित्रपटाचे नाव असून त्यात शाहिद कपूर आहे. चित्रपट पंजाबमधील आजच्या युवकांच्या जीवनावर आधारित आहे. शाहिदची यात एका पंजाबी युवकाची भूमिका असेल,असे म्हटले जात आहे. अभिनेत्याची निवड झाल्यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी नायिकेचा शोध घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान चित्रपट निर्मात्यांनी प्रियांका चोप्राशी संपर्क केला आहे.
आता प्रियांका आपल्या माजी प्रियकरासोबत चित्रपट करणार का, हा मोठा प्रश्न आहे. शाहिद आणि प्रियांका एकत्र येण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. दोघे एकमेकांचे शेजारी आहेत. शिवाय दोघांचे संबंधही चांगले आहेत. गेल्या वर्षी जेव्हा प्रियांकाच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा प्रियांका मुंबईच्या बाहेर असतानाही शाहिद तिचे सांत्वन करण्यासाठी तिच्याकडे गेला होता. आता दिग्दर्शक अभिषेक चौबेचा हा प्रस्ताव प्रियांका धुडकवणार का स्वीकारणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.