आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिदची चुक बनली टायगरची \'हीरोपंती\', 3 दिवसांत कमावले 20 कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमाची निवड करण्यात अनेकदा शाहिद चुकीचे निर्णय घेतो. त्याचा फायदा इतर अभिनेत्यांना होतो. त्याच्यासोबत साजिद नाडियाडवाला यांना 'हीरोपंती' बनवण्याची इच्छा होती. परंतु सिनेमा शेवटी टायगर श्रॉफच्या खात्यात आला आणि इंडस्ट्रीला नवीन स्टार मिळाला.
झाले असे, की 2008मध्ये आलेल्या 'परुग' या तामिळ सिनेमाचा रिमेकाचे अधिकार निर्माता रजत रवैल यांनी 18 लाखांमध्ये खरेदी केले होते. त्यांना हा रिमेक शाहिदसोबत बनवायचा होता. परंतु रजत यांच्यासमोर शाहिदने अट ठेवली, की सिनेमासोबत एखादी मोठी प्रॉडक्शन कंपनी जोडावी. जसे, त्यांनी 'रेडी' सिनेमासोबत सोहेल खान आणि टी-सीरीजला जोडले होते.
रजत यांनी सिनेमाची कहानी साजिद यांना ऐकवली आणि त्यानंतर शाहिदला सिनेमात आणण्यासाठी साजिद यांनी 80 लाखांमध्ये अधिकार खरेदी केले. रिमेकचे एक्सपर्टच्या रुपात सर्वात पहिले बोर्डावर आलेल्या प्रियदर्शन आणि नंतर अनीस बज्मीलाही शाहिदने असहमती दर्शवली.
या तडजोडीमध्ये दीड वर्ष निघून गेल्यानंतर साजिदला समजले, की शाहिदला सिनेमामध्ये काहीच रुची नाहीये. त्यांच्यामध्ये कोणताही करार झाला नसल्याने विवाद न करता दोघेही वेगळे झाले. आता साजिदने नवोदित अभिनेता टायगरला साइन केले होते. दिग्दर्शक म्हणून साबिर खानला घेण्यात आले आणि सिनेमा टायगरच्या खात्यात पडला.
'हीरोपंती'ने ओपनिंगच्या दिवशी 6.5 कोटी आणि दुस-या दिवशी 6 कोटी आणि तिस-या दिवशी 7.5 कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या आठवड्यात या सिनेमाने एकुण 20 कोटींचा व्यवसाय केला. कोणत्याही नवोदित स्टार्सना पहिल्या तीन दिवसांत सिनेमाची निर्मिती खर्च भरून काढणे सर्वात महत्वाचे ठरते. सोबतच, प्रेक्षकांना सिनेमा आवडणेसुध्दा अवश्यक असते.
यापूर्वी शाहिदने करण जोहरसोबत दक्षिणचा 'वेट्टई' सिनेमाचा रिमेक साइन केला होता. परंतु शुटिंगच्या एका महिन्यापूर्वी त्याने सिनेमा सोडला. करण आणि सह-निर्माता यूटीव्ही यांनी आता या रिमेकसाठी अर्जुन कपूरची निवड केली आहे.
'हीरोपंती'ने पहिल्या आठवड्यात 20 कोटींचा व्यवसाय केला आणि हिट होऊन टायगरला स्टार्सच्या यादीत स्थान दिले. सिनेमाच्या यशाकडे बघून कदाचित शाहिदला आता पश्चाताप झाला असावा.