आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Check Out Pictures Of Shahid Kapoor’S New Sea Facing Apartment

या आलिशान बिल्डिंगमध्ये आहे शाहिद कपूरचे नवे सी-फेसिंग घर, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहिद कपूर (इनसेटसमध्ये)चा सी-फेसिंग नवीन फ्लॅट)
मुंबईः अभिनेता शाहिद कपूर लवकरच आपल्या नवीन अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार असल्याची बातमी आहे. त्याचे हे नवीन घर जुहू येथे आहे. divyamarathi.com तुम्हाला शाहिद कपूरचे नवीन घर असलेल्या प्रनेता अपार्टमेंटची काही छायाचित्रे दाखवत आहे. लवकरच येथे शाहिद वास्तव्याला असेल.
बातम्यांनुसार, शाहिदने जून 2014मध्ये हा नवीन फ्लॅट खरेदी केला होता. तेव्हापासून तो या घराच्या इंटेरियरमध्ये बिझी होता. बिल्डिंगच्या ग्राऊंड फ्लोअरवर शाहिदचा हा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये 1000 चौ. फुटाचा खासगी बीज होता. मात्र आता शाहिदने या बीचचे रुपांतर बगिच्यात केले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद स्वतः घराचे इंटेरियर आणि डिझायनिंगकडे लक्ष
देतोय. विशेष म्हणजे अभिनेत्री विद्या बालनचे घरसुद्धा याच अपार्टमेंटमध्ये आहे. 2012 मध्ये तिचे पती सिद्धार्थ रॉय कपूर यांनी हे घर विद्याला भेट म्हणून दिले होते. विद्याच्या या घराची किंमत 14 कोटी इतकी आहे.
शाहिद आपल्या नवीन घरात स्थायिक झाल्यानंतर एक जंगी पार्टी आयोजित करणार असल्याचे
समजते. पुढील स्लाईड्समध्ये पाहा शाहिद कपूरच्या नवीन घराची काही छायाचित्रे...