आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shahid Kppoor And Shraddha Kapoor Launch The New Song From Haider

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Pics: शाहिदने 'बिस्मिल-बिस्मिल' गाण्यावर केला डान्स, श्रध्दाने दिली साथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहिद कपूर आणि श्रध्दा कपूर)
मुंबई: शाहिद कपूरचा 'हैदर' सिनेमाचे शुक्रवारी (19 सप्टेंबर) गाणे लाँच करण्यात आले. यावेळी त्याच्यासह अभिनेत्री श्रध्दा कपूरसुध्दा दिसली. या इव्हेंटचे आयोजन मुंबईमध्ये करण्यात आले होते.
लाँचिंग इव्हेंटदरम्यान शाहिद-श्रध्दाने एकमेकांना साथ देत 'बिस्मिल-बिस्मिल' गाण्यावर डान्स केला. इव्हेंटमध्ये श्रध्दाने फ्लोरल शॉर्ट ड्रेस परिधान केलेला होता. तसेच, शाहिद ब्लॅक आउटफिटमध्ये दिसून आला. त्याने ब्लॅक जीन्स आणि टी-शर्ट आणि जॅकेट घातलेले होते. गेल्या काही दिवसांपासून श्रध्दाची तब्येत ठिक नव्हती, तेव्हा तिने टि्वट केले होते, "even this flu & fever can't stop my excitement to promote #Haider on #KBC tomorrow! But abhi some rest & dava & time to sl.. zzz."
'हैदर'चे दिग्दर्शन विशाल भारव्दाजने केले असून त्यामध्ये शाहिद-श्रध्दासह के के मेनन, तब्बूसुध्दा दिसणार आहे. हा सिनेमा पुढील महिन्यात अर्थातच 2 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे. याच तारखेला हृतिक रोशनचा 'बँग बँग'सुध्दा रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लाँचिंग इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या शाहिद-श्रध्दाची छायाचित्रे...