आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PHOTO: Celebs At Hollywood Planet Beach Resort In Goa

SPOTTED: अबरामसोबत शाहरुखने एन्जॉय केली BEACH PARTY

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुलगा अबरामसोबत शाहरुख खान)
गोवाः मंगळवारी अभिनेता शाहरुख खान त्याचा धाकटा मुलगा अबरामसोबत बीच पार्टी एन्जॉय करताना दिसला. हे दोघेही समुद्रकिना-यावर रेतीवर बसलेले दिसले. वरील छायाचित्रात अबराम खेळण्यात बिझी तर एसआरके आपल्या या चिमुकल्याला न्याहाळताना दिसतोय.
पत्नी गौरी आणि मुलगा अबरामसोबत शाहरुख गोव्यात पोहोचला होता. निमित्त होते,
अभिनेता-निर्माता सचिन जोशीच्या 'हॉलिवूड प्लॅनेट' नावच्या नवीन रिसोर्ट ओपनिंगचे. सचिन जोशीने गोव्यात आपले नवीन रिसोर्ट सुरु केले आहे. यानिमित्ताने त्याने बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित केले होते.
रिसोर्टच्या ओपनिंग पार्टीमध्ये रितेश-जेनेलिया, वरुण धवन, कृती सेनन, सोहेल खान, सीमा खान, डिनो मोरियासह बरेच सेलेब्स सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या रिसोर्टचे इंटेरियर शाहरुखची पत्नी गौरी खानने केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, गोव्यात क्लिक झालेली सेलेब्सची खास छायाचित्रे.