आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DDLJ 1000 Week: इव्हेंटमध्ये दिसली शाहरुख-काजोलची लव्ह केमिस्ट्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(काजोल आणि शाहरुख खान)
मुंबईः ऑन स्क्रिनची सुपरहिट जोडी शाहरुख खान आणि काजोल ऑफ स्क्रिनसुद्धा हिट आहे. हे दोघेही शुक्रवारी यशराज स्टुडिओत पोहोचले. येथे 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमाला शंभर आठवडे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जंगी सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोघांनीही 1995च्या आठवणींना उजाळा दिला.
इव्हेंटमध्ये शाहरुख आणि काजोल ब्लॅक आउटफिटमध्ये दिसले. काजोलने हेमा कौल यांनी डिझाइन केलेला गाऊन परिधान केला होता. काजोलची हेअरस्टाइल बरीच स्टायलिश होती. तिने गळ्यात ज्वेलरी घातली नव्हती. मात्र हातात एक डायमंड रिंग दिसली. पायाला दुखापत झाल्यामुळे काजोलने हातात एक छडी पकडली होती. यावेळी काजोल आणि शाहरुखची लव्ह केमिस्ट्री उपस्थितांना बघायला मिळाली.
काजोलने छडी पकडून केला डान्स
या इव्हेंटमध्ये काजोलने छडीच्या सहाय्याने डान्स केला. 'DDLJ' या सिनेमात शाहरुखने गिटार वाजवली होती. यावेळी मंचावर काजोलने छडीला गिटार बनवले.
अनेक सिनेमांत एकत्र केले आहे काम
शाहरुख आणि काजोल ही हिट जोडी 'बाजीगर' या सिनेमात पहिल्यांदा एकत्र झळकली होती. या सिनेमात या जोडीला लोकांनी खूप पसंत केले होते. त्यानंतर या जोडीने 'करन अर्जुन', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम' आणि 'माय नेम इज खान' या सिनेमांत एकत्र काम केले आहे. शिवाय काही सिनेमांमध्ये कॅमिओ रोलसुद्धा केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या शाहरुख-काजोलची निवडक छायाचित्रे...