आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'DDLJ\' होता SRKचा पहिला 100 कोटी क्लबचा सिनेमा, 16 वेळा रचला आहे विक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहरुखसोबत 'हॅपी न्यू इअर'मध्ये दीपिका पदुकोण आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'मध्ये काजोल)

मुंबई: बॉलिवूड बादशाह अर्थातच शाहरुख खान आणि काजोल देवगणचा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमाने 12 डिसेंबर रोजी 1000 आठवडे पूर्ण केले. 20 ऑक्टोबर 1995 रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत हा सिनेमा मुंबईतील मराठा मंदिरमध्ये यशस्वीरित्या सुरु आहे. शाहरुखच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 122 कोटींचा व्यवसाय केला होता. त्याच्या शेवटच्या रिलीज झालेला 'हॅपी न्यू इयर' या सिनेमाने भारतात 200 कोटींची तर ओवरसीजमध्ये मिळून एकंदरीत 422 कोटींची कमाई केली होती.
शाहरुख इंडस्ट्रीचा सुपरस्टार तर आहेच, परंतु आता तो 100, 200 आणि 300 कोटींची कमाई करणारा अभिनेता झाला आहे. बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या सिनेमांचा काही वर्षांपासून चांगलाच बोलबाला आहे. शाहरुखने स्वत:ला बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यापासून सिध्द केले आहे. बॉलिवूडमध्ये एक काळ असाही होता, जेव्हा सिनेमा केवळ 50 कोटींची कमाई करत होता. याच कमाईची सर्वत्र चर्चा होत असे. परंतु आता सिनेमांचा 300 कोटींचा व्यवसायसुध्दा कमी वाटतो.

शाहरुखने आपल्या करिअरची सुरुवात 'दीवाना' या सुपरहिट सिनेमातून केली. त्यावेळी सिनेमांची सरासरी कमाई असायची. मात्र, शाहरुखचे सिनेमे आता 300 ते 400 कोटींचा व्यवसाय आरामात करतात. शाहरुखच्या 'हॅपी न्यू इअर'ने आतापर्यंत अनेक विक्रम मोडीत काढत आपला नवीन रेकॉर्ड केला आहे. तसे पाहते, शाहरुखचा हा 16 असा सिनेमा आहे, ज्याने 100 कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले आहे.

किंग खानचे आतापर्यंत कोण-कोणते सिनेमे 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...