आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan, Abhishek Bachchan And Sonu Sood Walk The Ramp For Manish Malhotra

PICS: ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये रॅम्पवर अवतरले शाहरुख, दीपिका, अभिषेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून- रॅम्पवॉक करताना शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि अभिषेक बच्चन)
मुंबई - अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'हॅपी न्यू इयर' या सिनेमाचा ट्रेलर अलीकडेच रिलीज करण्यात आला. या सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी खास रॅम्पवॉकचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिनेमातील संपूर्ण स्टारकास्ट रॅम्पवर अवतरली होती.
या सिनेमात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसह जॅकी श्रॉफ, बोमन इराणी, सोनू सूद, विवान शाह मेन लीडमध्ये आहेत. या सर्व कलाकारांसह या सिनेमाची दिग्दर्शिका फराह खान फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेले पोशाष परिधान करुन रॅम्पवर आले होते. दीपिका साडीत दिसली, तर शाहरुख, अभिषेक, सोनू ट्रेडिशनल लूकमध्ये दिसले. या सर्वांनी डिझायनर इंटो-वेस्टर्न परिधान केले होते.
फराह खानचा मुलगा जार आणि मुलगीसुद्धा रॅम्पवर दिसले. 'हॅपी न्यू इयर' हा सिनेमा रेड चिलीज एन्टरटेन्मेंट प्रॉडक्शनची निर्मिती असून याचे डिस्ट्रिब्युटर यशराज फिल्म्स आहे. येत्या 24 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा रॅम्पवॉक करतानाची सेलेब्सची खास छायाचित्रे...