[मागील बाजुला डावीकडून, गौरीची आई सविता, मामी नारु, मामा तेजिंदर, शाहरुख खान आणि पुढील रांगेत, मामा-मामींचा मुलगा रुस्तम पत्नी श्वेतासोबत, शेजारी गौरी खान]
मुंबई - अभिनेता
शाहरुख खानने यश, नाव, पैसा, प्रसिद्धी स्वबळावर मिळवली आहे. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक जण शाहरुखला
आपला आदर्श मानतात. त्याचे चाहते जगभरात आहेत. मात्र शाहरुखच्या पत्नी आणि मुलांव्यतिरिक्त त्याच्या इतर कुटुंबीयांविषयी त्याच्या चाहत्यांना फार काही ठाऊक नाहीये. पत्नी गौरी खान, मुले आर्यन, अबराम आणि मुलगी सुहाना यांच्याविषयी अधूनमधून मीडियात बातम्या येत असतात. शाहरुखचे आईवडील आता या जगात नाहीत. त्याला एक मोठी बहीण असून तिचे नाव शहनाज आहे. याव्यतिरिक्तही शाहरुख-गौरीच्या कुटुंबात अनेक सदस्य आहेत. मात्र त्यांच्याविषयी तुम्हाला ठाऊक नाहीये.
शाहरुखचे सासर अर्थातच गौरीचे माहेर दिल्लीत आहे. शाहरुख जेव्हाही दिल्लीला येतो, तेव्हा आवर्जुन आपल्या सासरच्या मंडळींना भेटत असतो. इतकेच नाही तर त्यांना गरजेच्या वेळी आवश्यक ती मदतसुद्धा करतो. तुम्हाला हे ठाऊक नसेल, की गौरीच्या माहेरी एक नवोदित अभिनेत्रीसुद्धा आहे.
शाहरुखची पत्नी गौरी हिचा आज 44वा वाढदिवस आहे. आज तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत divyamarathi.com तुम्हाला शाहरुखच्या सासरच्या मंडळींची एक्सक्लूझिव्ह छायाचित्रे दाखवत आहे. शाहरुखच्या सासू-सास-यांसोबतच मेव्हणा-मेव्हणी आणि इतर नातेवाईकांची ही छायाचित्रे आहेत.
शाहरुख-गौरीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....