आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan And Katrina Kaif Can Work Rohit Shetty Film

PICS: रोहितच्या सिनेमात कतरिनासह पुन्हा एकदा रोमान्स करू शकतो शाहरुख!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'जब तक है जान'च्या एका सीनमध्ये शाहरुख खान आणि कतरिना कैफ
मुंबई: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि रोहित शेट्टी यांची जोडी यापूर्वी रुपेरी पडद्यावर यशस्वी ठरली आहे. रोहितच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'चेन्नई एक्स्प्रेस'ने जवळपास 400 कोटींचा व्यवसाय केला. आता बातमी अशी येत आहे, की पुढील वर्षी पुन्हा एकदा रोहितच्या दिग्दर्शनाखाली बनणा-या सिनेमात शाहरुख काम करणार आहे.
बातम्यांनुसार, रोहित शेट्टी हॉलिवूडच्या 'मिस्टर अँड मिसेज स्मिथ' या सुपरहिट सिनेमाचा रिमेक बनवत आहे. 2005मध्ये रिलीज झालेला 'मिस्टर अँड मिसेज स्मिथ'मध्ये ब्रँड पिट आणि अँजेलिना जोली यांनी मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमाच्या रिमेकमध्ये शाहरुख 'बार्बी डॉल' कतरिना कैफसह पुन्हा एकदा काम करू शकतो. याची अद्याप औपचारिकरित्या घोषणा झालेली नाहीये. परंतु लवकरच याची घोषणा केली जाणार आहे. रोहित सध्या 15 ऑगस्टला रिलीज होणा-या 'सिंघम रिटर्न्स'ची प्रतिक्षा करत आहे.
'जब तक है जान'मध्ये एकत्र दिसले होते शाहरुख-कॅट

यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'जब तक है जान'मध्ये शाहरुख आणि कतरिना यांनी एकत्र काम केले होते. 2012मध्ये आलेल्या या सिनेमातील कतरिना आणि शाहरुख यांच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. हा यशराज चोप्रा यांचा शेवटचा सिनेमा होता. कारण ऑक्टोबर 2012मध्ये त्यांचे निधन झाले होते. या सिनेमात शाहरुखने मेजर समर आनंद आणि कतरिनाने मीरा थापरची भूमिका साकारली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'जब तक है जान'मधील शाहरुख-कतरिनाच्या जोडीची 10 छायाचित्रे...