आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan And Salman Khan At Baba Siddique’S Iftaar Party

PIX: खान्सपासून आदित्य-अर्जुनपर्यंत, बाबा सिद्दीकी यांच्या पार्टीत सेलेब्सची मंदियाळी, पाहा व्हिडिओ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इफ्तार पार्टीत अभिनेता अर्जुन कपूर, आदित्य पांचोली, शाहरुख खान आणि बाबा सिद्दीकी
मुंबई: बॉलिवूड बादशाह शाहरुख खान आणि सुपरस्टार सलमान खान रविवारी (6 जुलै) काँग्रेस नेता बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत पोहोचले होते. हे दोन्ही स्टार्स या पार्टीत पुन्हा एकदा जूने वाद विसरून गळाभेट घेतली. बाबा सिद्दीकी यांनी रमजाननिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.
या पार्टीत शाहरुख काळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसला. तो सलमानचे वडील सलीम खान यांच्याजवळ बसला होता. त्यानंतर सलमानसुध्दा पार्टीमध्ये पोहोचला. पार्टीमध्ये उपस्थित सर्व लोकांनी एकंमेकांची भेट घेतल्यानंतर दोन्ही स्टार्सनी गळाभेट घेतली. यापूर्वी दोघे 2013मध्ये सिद्दीकी यांच्या इथेच आयोजित इफ्तार पार्टीत एकत्र दिसले होते. तेव्हा ते तब्बल सहा वर्षांनी एकमेकांना भेटले होते आणि अलिंगने दिले होते.
या पार्टीत शाहरुख, सलमानसह बॉलिवूडचे अनेक दिग्गज सेलेब्स सामील झाले होते. त्यामध्ये सोहेल खान, अरबाज खान, आदित्य पांचोली, सुनील शेट्टी, फिरोज खान, अर्जुन कपूर, मधुर भंडारकर, साजिद नाडियाडवाला, शहजाद खानसह अनेक स्टार्स पोहोचले होते. याच्यासह राजकिय नेत्यांनीही उपस्थिती लावली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत पोहोचलेल्या बॉलिवूड सेलेब्सची छायाचित्रे...