आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख खान ५० व्या वर्षात पदार्पण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानने रविवारी ५० व्या वर्षात पदार्पण केले. वाढदिवसानिम्मित "मन्नत' बंगल्यावर छोटेखानी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या चाहत्यांनी "मन्नत'बाहेर प्रचंड गर्दी केली होती. किंग खानने दरवर्षीप्रमाणे यंदाही चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. महानायक अमिताभ बच्चन, ऐश्वर्या, अभिषेक बच्चन यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी िट्वटरवरून शुभेच्छा दिल्या. दिवाळीत प्रदर्शित झालेल्या शाहरुखच्या "हॅपी न्यू इयर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.