मुंबई: शाहरुख खान मंगळवारी (11 नोव्हेंबर) मुलांच्या चिल्ड्रन मंथ या इव्हेंटमध्ये सामील झाला होता. 14 नोव्हेंबर रोजी साज-या केल्या जाणा-या बालदिनापूर्वी त्याने येथे पोहचून मुलांसोबत वेळ घातला. हा इव्हेंट किडजानिया (KidZania)मध्ये आयोजित करण्यात आला होता.
शाहरुख इव्हेंटमध्ये कॅज्युअल लूकमध्ये पोहोचला होता. त्यांने पांढ-या रंगाचा टी-शर्ट, ब्लू जीन्स आणि ब्लॅक जॅकेट परिधान केलेले होते. उपस्थित मुलांनी त्याची एक पेंटीगसुध्दा त्याला गिफ्ट केली. शाहरुख इव्हेंटमध्ये खूप आनंदी दिसून आला. त्याने
आपले अनुभव या मुलांशी शेअर केले. एवढेच नव्हे, शाहरुखने मुलांसोबत डान्ससुध्दा केला.
शाहरुख म्हणाला, 'झाडू हातात घेणे थोडे विचित्र वाटते'
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या 'क्लीन इंडिया कॅम्पेन'मध्ये बॉलिवूडचे अनेक कलाकार जोडल्या गेले आहेत. टेनिस खेळाडू
सानिया मिर्झासुध्दा या अभियानाशी जोडली होती. तिने शाहरुखला या अभिनयानाशी जोडण्यासाठी अग्रह केला होता. त्याविषयी शाहरुखने या इव्हेंटमध्ये सांगितले, 'मी मनाची स्वच्छता करत आहे. माझे मन स्वच्छ आहे. तसे पाहता, मला झाडू हातात घ्यायला थोडे वेगळे वाटते.' मात्र त्याने
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या अभिनायाशी सहमती दर्शवली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहरुखची या इव्हेंटमधील छायाचित्रे...