आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan Celebrates Ipl Victory With Preity Zinta

शाहरुखच्या विजयावर सामना हरलेल्या प्रितीने लावले ठुमके, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड बादशाह शाहरुख खानला नुकतेच, केआरके (कमाल राशिद खान)मुळे खूप टिका सहन करावी लागली आहे. झाले असे होते, की केआरकेने टि्वट केले होते, की नरेंद्र मोदी पंतप्रधान होताच, तो देश सोडून जाणार. त्यावेळी अनेक लोकांनी केआरकेला एसआरके समजून त्याला टिकेचे शिकार बनवले. सध्या प्रकरण शांत झाले असून हि वेळ किंग खानसाठी आनंद साजरा करण्याची आहे.
आयपीएलचे पहिला क्वालिफायर सामना शाहरुखची फ्रेंचाइजी टीम कोलकाता नाइट राइडर्स आणि प्रिती झिंटाची फ्रेंचाइजी टीम किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये खेळण्यात आला. हा सामना शाहरुख खानने 28 धावांनी जिंकला. सामना बघण्यासाठी शाहरुख आणि प्रिती झिंटा दोघेही पोहोचले होते. यावेळी जेव्हा कोलकाता नाइट राइडर्सने विजय नोंदवला, तेव्हा शाहरुखसाठी आनंदाचे क्षण आले.
प्रिती झिंटाने साजरा केला शाहरुखचा आनंदाचा क्षण
क्रिकेटच्या खेळामध्ये पराभव झालेल्या टीमचा मालक जिंकलेल्या टीमच्या मालकासह सेलिब्रेशन करत नाही. परंतु शाहरुखने प्रिती झिंटासोबत मैदानावर जोरदार मस्ती केली. त्याने प्रितीला अलिंगन दिले, त्यानंतर तिच्यासोबत ठुमके लावले. किंग्स इलेव्हन पंजाबचा पराभव झाल्यानंतरसुध्दा प्रितीने शाहरुखला सेलिब्रेशनमध्ये पूर्ण साथ दिली. परंतु, प्रितीच्या टीमने फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आणखी एक संधी चेन्नई सुपर किंग्सच्या विरोधात सामना खेळताना मिळणार आहे.
शाहरुखचा डान्स
डान्सची मजा उभा राहूनच येते. परंतु शाहरुखने विजयानंतर आपल्या चाहत्यांसाठी मैदानावर बसल्या-बसल्या डान्स करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी पूर्ण मैदानाला एक चक्कर मारली आणि त्यांचे आभारसु्ध्दा मानले. टीमच्या खेळाडूंची गळाभेट घेतली.
अनेक सिनेमांमध्ये एकत्र केले आहे काम
1998 दिल से
2003 कल हो ना हो
2004 वीर जारा
2006 कभी अलविदा ना कहना
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा शाहरुखने टीमच्या विजयानंतर प्रिती झिंटासोबत आणि टीमसह कसे केले सेलिब्रेशन...