आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan, Deepika Padukone, Abhishek Bachchan, Farah Khan, Sonu Sood,Vivaan Shah And Boman Irani At Happy New Year Music Launch

PIX: शाहरुख-दीपिकाच्या 'हॅप्पी न्यू इअर'चे थाटात म्यूझिक लाँच, इव्हेंटमध्ये थिरकले स्टार्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहरुख खान, दीपिका पदुकोण, फराह खान आणि अभिषेक बच्चन)

फराह खान दिग्दर्शित 'हॅप्पी न्यू इअर' या आगामी सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबईत थाटात पार पडला. यशराज स्टुडिओमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सिनेमा दिग्दर्शिका फराह खान आणि शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, बोमन ईराणी, सोनू सुद आणि विवानसह सर्व स्टारकास्ट उपस्थित होती.
टीव्ही स्टार्स ऋत्विक धंजानी आणि कुंवर अमरने इव्हेंट होस्ट केला. यावेळी निती मोहन, सुखविंदर सिंग या गायकांनी परफॉर्मन्स दिला. या सिनेमातील संपूर्ण स्टारकास्टनेही यावेळी मंचावर ताल धरला. सिनेमातील 'इंडिया वाले' या गाण्यावर हे स्टार्स थिरकले.
या म्युझिक लाँचला फराह खानची तिळी मुलेसुद्धा उपस्थित होती. यावेळी दीपिका या मुलांसह वेळ घालवताना दिसली. दीवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या म्युझिक लाँच सोहळ्याची खास क्षणचित्रे...