(शाहरुख खान आणि गौरी)
मुंबईः बॉलिवूडचा सुपरस्टार
शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी यांची लव्ह स्टोरी एखाद्या फिल्मी कहाणीपेक्षा वेगळी नाहीये. वेगवेगळ्या धर्माचे असलेल्या शाहरुख-गौरीने केवळ एकमेकांचा स्वीकारच केला नाही, तर हे दोघे आज बॉलिवूडमधील आदर्श जोडप्यांपैकी एक आहेत. शाहरुख खान आणि गौरीची भेट शालेय जीवनात एका पार्टीत झाली होती. त्या पार्टीत शाहरुखने गौरीला एका मुलासोबत डान्स करताना पाहिले होते. तिला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. शाहरुखचे लव्ह अॅट फस्ट साइट होते. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे.
शाहरुखच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत आम्ही तुम्हाला या दोघांच्या लव्ह स्टोरीविषयी सांगत आहोत.
शाहरुख-गौरीची पहिली भेट झाली तेव्हा तो 19 वर्षांचा तर गौरी 14 वर्षांची होती. शाहरुखने पार्टीत गौरीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गौरीने त्याच्यासोबत बोलणे टाळले. मात्र किंग ऑफ रोमान्सने हार न मानता गौरीला
आपल्या प्रेमात पाडले आणि त्यांचे अफेअर सुरु झाले. शाहरुख गौरीविषयी खूप पजेसिव्ह आहे.
तो एवढा पजेसिव्ह आहे, की जर गौरीने आपले केस जरी मोकळे ठेवले तरीदेखील तो तिच्याशी भांडायचा. शाहरुखच्या या सवयीला कंटाळून एकेदिवशी गौरी कुणालाही न सांगता दिल्लीहून मुंबईत आली होती. शाहरुख गौरीची समजूत घालण्यासाठी तिच्या शोधात मुंबईत आला. मात्र मुंबईत गौरी कुठे आहे, हे त्याला ठाऊक नव्हते, पण त्याने अनेक दिवस तिचा शोध घेतला.
एकेदिवशी मुंबईतील अक्सा बीचवर शाहरुखला गौरी भेटली. त्याला बघताच तिला रडू कोसळले. शाहरुख आणि गौरी आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात करु इच्छित होते, मात्र दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे गौरीच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. गौरीच्या कुटुंबीयांची समजूत घालताना शाहरुखच्या नाकी नऊ आले होते. अखेर त्याने गौरीच्या कुटुंबीयांचा होकार मिळवण्यात यश मिळवले. 25 ऑक्टोबर 1991 रोजी हे दोघे साता जन्माच्या गाठीत अडकले. आज हे दोघेही बी टाऊनमध्ये यशस्वी दाम्पत्य आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा शाहरुख-गौरीच्या खासगी आयुष्यातील निवडक छायाचित्रे...