आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किंग खानला पालिकेचा दणका, अनधिकृत रॅम्प तोडण्याचे दिले आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः 'मन्नत' बंगल्याबाहेरील रॅम्पवर उभी असेलेली व्हॅनिटी व्हॅन आणि इनसेटमध्ये शाहरुख खान)

मुंबईः वांद्रास्थित 'मन्नत' बंगल्याबाहेर 'व्हॅनिटी व्हॅन'साठी बांधलेल्या अनधिकृत रॅम्पविरुद्ध कारवाईमुळे अभिनेता शाहरुख खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या अनधिकृत रॅम्पविरुद्ध कारवाई करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. पालिका अधिकाऱ्यांनी गुरुवारी या रॅम्पची पाहणी केली असून शुक्रवारी शाहरुखला नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये हा रॅम्प तोडण्यासाठी त्याला सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सात दिवसांत असे न झाल्यास पालिका हा रॅम्प तोडणार असल्याचे समजते.
वांद्रे येथील माउंट मेरी चर्चकडे जाणाऱ्या रस्त्यावर शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला असून बंगल्याबाहेर हा रॅम्प उभारण्यात आला आहे. या रॅम्पमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी पालिकेच्या विभाग कार्यालयात केली होती. स्थानिक रहिवाशांनी ही बाब खासदार पूनम महाजन यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून या रॅम्पवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या रॅम्पची पाहणी करून त्यावर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी गुरुवारी दिले. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी गुरुवारी पुन्हा 'मन्नत'बाहेरील रॅम्पची पाहणी केली.
सामान्य लोकांपेक्षा कोणी मोठे नाही-
पूनम महाजन यांचे म्हणणे आहे की, स्थानिक लोकांनी मला या रस्त्याची कागदपत्रे दाखविली आहेत व हा सरकारी रोड असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या रस्त्याचा वापर सार्वजनिकरित्या सर्वांना करता आला पाहिजे. कोणतीही व्यक्ती अथवा संघटना सामान्य लोकांपेक्षा मोठी नाही. मी लोकांना आश्वस्त करते की त्यांची समस्या लवकरच सुटेल.
शाहरुख खानचा आहे हा रस्ता-
शाहरुख खानच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की, हा रोड आणि रॅम्प शाहरुख खान याचाच आहे. तसेच मुंबई महापालिकेने अजून येथील जागा अधिग्रहित केली नाही. त्यामुळे मुंबई पालिका जोपर्यंत ही जागा ताब्यात घेत नाही तोपर्यंत शाहरूख खानचाच या रस्त्यावर व रॅम्पवर हक्क राहणार आहे.