आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख दिवाळीत उडवणार ‘हॅप्पी न्यू इयर’चा बार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘हॅप्पी न्यू इयर’ सिनेमाचा व्यवहार 200 कोटी रुपयांत करण्याचा निर्णय घेतलेल्या शाहरुखने शेवटी यशराज फिल्म्सच्या आदित्य चोप्राला हा सिनेमा विकला आहे. दोघांनी यापूर्वी पाच चित्रपट दिवाळीत प्रदर्शित केले जे सुपरहिट राहिले. ‘हॅप्पी ..’ हा सहावा सिनेमा आहे. त्यामुळे दिग्दर्शिका फराह खान आणि शाहरुख खानच्या हिट कॉम्बोमध्ये आता यशराज बॅनरचा सुरपहिट फॅक्टर जोडला गेला आहे.
सहा वर्षांनंतर यशराजच्या आदित्य चोप्राने बाहेरच्या प्रॉडक्शनचा म्हणजे शाहरुखच्या रेड चिलीज कंपनीचा ‘हॅप्पी न्यू इयर’ हा सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी विकत घेतला आहे. ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या यशानंतर शाहरुख या सिनेमाचे सॅटेलाइट व वितरण अधिकार 200 कोटींमध्ये विकण्याची योजना आखत होता. आदित्यच्या स्वभावाची माहिती असलेले सूत्र त्याला कंजूष खरेदीदार म्हणतात. तो खूप विचारपूर्वक आणि पूर्ण गणित लावूनच व्यवहार करतो. सूत्रानुसार ‘हॅप्पी न्यू इयर’चा व्यवहार 200 कोटींपेक्षा कमी किमतीत झाला आहे. इतका की दोघेही आपापल्या कंपनीला फायदा मिळवून देऊ शकतील.
पुढे वाचा, शाहरुख आणि आदित्यचे हि ट कॉम्बिनेशन...