आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan Is Keeping Eye On Salman Khan And Ajay Devgan's Films

सलमान आणि अजयच्या सिनेमांवर असणार शाहरुखची करडी नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेल्यावर्षी रिलीज झालेला शाहरुख खान स्टारर 'चेन्नई एक्स्प्रेस' हा सिनेमा दोनशे कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला होता. यामागे शाहरुखने आखलेली रणनीती होती. आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहरुखने महानगरांमधील विमानतळांवर ट्रेनची प्रतिकृती ठेवली होती. शिवाय प्रत्येक मंचावर आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आवर्जुन हजेरीसुद्धा लावली होती. 'चेन्नई एक्स्प्रेस'च्या रिलीजच्या दुस-या आठवड्यात 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई' हा सिनेमा रिलीज झाला होता. या आठवड्यात रक्षाबंधन होते. यानिमित्ताने शाहरुखने आपल्या सिनेमाच्या तिकिटावर एक तिकिट फ्री वाटले.
आता यावर्षी शाहरुखच्या 'हॅपी न्यू इयर'पूर्वी जुलै महिन्यात सलमानचा 'किक' आणि ऑगस्टमध्ये अजय देवगणचा 'सिंघम रिटर्न्स' रिलीज होतोय.
'जय हो'नंतर सलमानने 'किक'साठी नवीन योजना आखल्या आहेत. चाहत्यांमध्ये जाऊन सलमान आपल्या सिनेमाचे प्रमोशन करणार आहे. तर अजय देवगणच्या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी बारा कोटींपेक्षा जास्तचा व्यवसाय केलेला नाहीये. मात्र 'सिंघम रिटर्न्स'साठी त्याने तीस कोटींचे टार्गेट ठेवलेले आहे. 'सिंघम रिटर्न्स' हा सिनेमा 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा सिनेमा काळ्या धनावर आधारित आहे. या सिनेमाचा प्रचार टायर टू शहरांमध्ये मोठ्या स्तरावर केला जाणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही सिनेमांच्या क्रिएटिव्ह टीम प्रमोशनसाठी जोरदार प्लानिंग करत आहेत. यादरम्यान फराह खान दिग्दर्शित 'हॅपी न्यू इयर' हा सिनेमा 2014च्या यशस्वी सिनेमांच्या यादीत खालच्या स्थानावर राहू नये, यासाठी शाहरुख दोन्ही सिनेमांच्या प्लानिंगवर करडी नजर ठेऊन आहे.
दीवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणा-या 'हॅपी न्यू इयर' या सिनेमाची प्रचार योजना 'किक' आणि 'सिंघम रिटर्न्स'च्या रिलीज आणि बिझनेसवर अवलंबून असणार आहे.
शाहरुख सिनेमाच्या संपू्र्ण स्टारकास्टसह ओवरसीज आणि भारतातील टायर टू शहरांमध्ये प्रमोशनसाठी जाणार आहेत. रिलीजवेळी तो मुंबईऐवजी महाराष्ट्रातील सिंगल स्क्रिन प्रेक्षकांमध्ये जाणार आहे. शाहरुखने आपल्या सिनेमाचे वितरण हक्क यशराज बॅनरला विकले आहेत.