आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा 3600 कोटींचा मालक असलेल्या शाहरुखच्या साम्राज्याची खास झलक...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा किंग खान अर्थातच अभिनेता शाहरुख खान ख-या अर्थाने किंग ठरला आहे. वेल्थ एक्स (Wealth-X's) या संस्थेने बुधवारी जाहीर केलेल्या बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील जगभरातील श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत शाहरुखने दुसरा क्रमांक पटकावला आहे. हा मान मिळणारा शाहरुख एकमेव भारतीय अभिनेता आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर 60 वर्षीय हॉलिवूड अभिनेते जेरी सेनफिल्ड आहेत. त्यांची एकुण मालमत्ता 800 दशलक्ष डॉलर इतकी आहे.

तर शाहरुख खानने हॉलिवूडच्या टॉम क्रूज, टॉम हंक्स, क्लिंट इस्टवूड आणि अॅडॅम स्नॅडलर या आघाडीच्या अभिनेत्यांना मागे टाकत या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. आयपीएल क्रिकेट टीमचा मालक आणि 50 पेक्षाही अधिक सिनेमांमधून भूमिका केलेला शाहरुख 'वेल्थ-एक्स' यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तो एकुण 600 दशलक्ष डॉलर (जवळजवळ 3600कोटी) संपत्तीचा मालक आहे. शाहरुखने हे साम्राज्य स्वबळावर उभे केले आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला शाहरुखच्या आलीशान घरांसह, कार, व्हॅनिटी व्हॅनची खास झलक दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बॉलिवूडच्या किंग खानचे साम्राज्य...