आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात तरी दिसेल का अबराम खान?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईद, आयपीएल आणि बॉलिवूड पाटर्य़ांमध्ये आपली मुले आर्यन आणि सुहाना यांना शाहरुख खान नेहमीच सोबत घेऊन जातो. मात्र, तिसर्‍या मुलाबाबत त्याचा हा उत्साह अद्याप दिसलेला नाही. अबराम हे शाहरुखच्या तिसर्‍या मुलाचे नाव आहे.
या महिन्यात अबरामचा पहिला वाढदिवस साजरा केला जाणार आहे. या एक वर्षात शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यातून अबरामचा एक फोटोदेखील काढणे कोणालाच जमले नाही. शाहरुख सोशल साइट्सवर सक्रिय आहे. आर्यन आणि सुहानाची काही छायाचित्रे त्याने या साइट्सवर पोस्ट केली आहेत. मात्र, सूत्रांच्या मते, पत्नी गौरीसह सुहानादेखील अबरामची छायाचित्रे सोशल साइट्सवर पोस्ट होणार नाही, याची खबरदारी घेत आहेत. शाहरुखप्रमाणे गालावर खळी असलेल्या या सरोगेट मुलाचा जन्म वेळेपूर्वीच झाला आहे. त्यानंतर त्याच्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. त्यामुळे अबरामला लोकांच्या नजरेतून वाचवण्यासाठी हा सारा आटापिटा केला जात आहे.
एकदा गौरीची काही छायाचित्रे विमानतळावर घेण्यात आली. मात्र, यात अबराम अंगरक्षकांच्या गराड्यात कुठेच दिसत नाही.