(शाहरुख आणि गौरी खान त्यांच्या BMW 6 series convertible कारमध्ये. फिचर्सच्या बाबतीत या कारची किंमत 1.12 पासून 1.75 कोटींपर्यंत आहे.)
आज अर्थातच 2 नोव्हेंबरला शाहरुख 49 वर्षांचा झाला आहे. बॉलिवूड किंग अर्थातच
शाहरुख खान त्याच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट किंग पध्दतीच्या वापरतो. मग तो सिनेमा असो अथवा घर किंवा लग्झरी कार. शाहरुखला बॉलिवूडचा सर्वात मोठा ड्रीमर मानले जाते. तो स्वप्न पाहतो आणि नंतर ते साकार करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतो. कदाचित यामुळेच कधी मारुती व्हॅनमध्ये फिरणा-या शाहरुखकडे आज लग्जरी कारचे मोठे कलेक्शन आहे.
ऐककाळी शाहरुखला त्याच्या कामाचे मानधन केवळ 50 रुपये मिळत होते, मात्र आज तो कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. तो आज जगातील कोणतीही गोष्ट खरेदी करू शकतो. चला आज जाणून घेऊया त्याच्या कार कलेक्शनविषयी...
अंबानी यांच्या अँटीलियाशी होते 'मन्नत'ची तुलना
मुंबई वांद्रा परिसरात शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्याची तुलना अंबानी यांच्या अँटीलिनाशी होते. शाहरुखच्या बंगल्यात सर्व सुविधा आणि वैशिष्टे आहेत. त्याच्या घरासारखे वैशिष्टे केवळ एखाद्या अब्जोपतीच्या घराचे असते. शाहरुखच्या या 6 मजली घरात लिव्हिंग रुम, बेडरुम, गेस्ट रुम, ऑफिस, लायब्ररी, जिम, मिनी, स्टुडिओ आणि कार पार्किंगसाठी बेसमेंटसुध्दा आहे.
कार कलेक्शन
शाहरुखकडे लग्झरी ब्राँड्सच्या 6पेक्षा जास्त कार आहेत. त्यामध्ये मित्सुबिशी, पजेरो, स्पोर्ट्स कार, ऑडी ए-6, बीएमडब्ल्यू 7, 6 सीरिज, लँड क्रूजर आणि रॉयल्स सामील आहेत. यामधील Mitsubishi Pajero SFX त्याची आवडती कार आहे. शाहरुखकडे ऐसी ब्लॅक कलरची कार आहे.
न्यूमरोलॉजीवर विश्वास ठेवणा-या शाहरुखचा लकी नंबर 555 असून ही त्याच्या सर्व कारचा नंबर आहे.
जाणून घ्या किंग खानच्या लाइफ स्टाइल संबंधित काही खास गोष्टी
- किंग खान ब्रँडेड वस्तू वापरतो. विशेषत: गॅजेट्स. तो ब्लॅकबेरीचा porsche डिझाइनचा P’9981
स्मार्टफोन वापरतो.
- बाहेर जाताना शाहरुख नेहमी Louis Vuittonची बॅग जवळ ठेवतो.
- Tag Heuer हा चश्माचा ब्रँड त्याचा आवडता आहे.
- दुबई त्याचे आवडत ह़लिडे डेस्टिनेशन आहे. वेळ मिळाल्यानंतर तो या ठिकणी कुटुंबासोबत येतो.
नोट: 'स्टार्स ऑन व्हिल' नावाने स्पेशल असलेल्या आमच्या या सीरिजमध्ये आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या कार कलेक्शनच्या लग्झरी कारविषयी सांगत आहोत. सोबतच, जाणून घ्या त्याच्या लाइफ स्टाइल संबंधित काही खास गोष्टी. पुढील स्लाइड्सवर आम्ही तुम्हाला या सेलेब्सच्या कार, बाइक्स आणि प्रयव्हेट जेटच्या कलेक्शनविषयी सांगणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहरुखची आवडती कार आणि काय आहे तिची किंमत...