फ्रान्सचे विदेश मंत्री लॉरेंट फेबियस आणि शाहरुख खान
मुंबई - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मंगळवारी फ्रान्सचे विदेश मंत्री लॉरेंट फेबियस यांनी सत्कार केला. फ्रान्सच्या वतीने 'नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनर' या सर्वोच्च नागरिक सन्मानाने शाहरुखचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात लॉरेंट फेबियस यांनी शाहरुखला फ्रान्समध्ये येण्याचे आमंत्रण दिले. याशिवाय फ्रान्समध्ये सिनेमांचे शूटिंग करण्याची ऑफरही दिली.
अमिताभ बच्चन यांच्यानंतर हा सर्वोच्च नागरिक सन्मान प्राप्त करणारा शाहरुख दुसरा बॉलिवूड अभिनेता आहे.
यावेळी शाहरुख म्हणाला, ''या प्रतिष्ठेच्या सन्मानासाठी सर्वांचे धन्यवाद. आज माझ्या आईचा
वाढदिवस आहे. ती आज हयात असती तर हा क्षण बघून ती खूप आनंदी झाली असती. मी शेकडो निर्माता-दिग्दर्शकांच्यावतीने हा सन्मान स्वीकारत आहे.''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या इवेंटची छायाचित्रे...