आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉम क्रूझपेक्षाही शाहरुख श्रीमंत, मिनिटाला कमावतो तब्बल 26 लाख रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 3600 कोटी रुपयांचे साम्राज्य उभे करणारा अभिनेता शाहरुख खान वेल्थ एक्स संस्थेने जाहीर केलेल्या जगभरातील गर्भश्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत दुस-या क्रमांकावर आला आहे. हे स्थान पटकावणारा शाहरुख पहिला भारतीय अभिनेता ठरला आहे. शाहरुखने हॉलिवूडच्या टॉम क्रूज, टॉम हंक्स, क्लिंट इस्टवूड आणि अॅडॅम स्नॅडलर या आघाडीच्या अभिनेत्यांना मागे टाकत या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.
किंग खानकडे एवढी संपत्ती कशी जमा झाली, याचा लेखा-जोखा..

कशी केली एवढी कमाई ?
दुबईच्या एका लग्नात 30 मिनिटांचा डान्स परफॉर्मन्स देण्यासाठी 8 कोटी रुपये. म्हणजेच मिनिटाला 26 लाख रुपये. दुबईतच नव्हे, मुंबईच्या लग्नाचे उदाहरण घ्या. 'देवदास' स्टाइलमध्ये ग्लास फोडला. स्वत:च्या आयपीएल टीमचे किस्से ऐकवले. काही पाहुण्यांना ऑटोग्राफ दिले. अर्धा तास थांबला आणि मानधन मिळाले पाच कोटी रुपये. या धामधुमीत सकाळी चार वाजण्यापूर्वी झोप मिळाली नसेल. दर वर्षी त्याला 250 लग्नांसाठी आमंत्रण येते. त्यापैकी तो किमान दहा लग्न समारंभांत जातो. त्यामुळे शाहरुख फक्त अभिनेता किंवा चित्रपटनिर्माता नाही, हे मानावेच लागेल. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या चेन्नई एक्स्प्रेस या सिनेमाने शाहरुखच्या संपत्तीत वाढ झाली. शाहरुखने 2013 मध्ये एकुण 220.50 कोटींची कमाई केली.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या शाहरुखचे सर्व बिझनेस फंडे आणि कसे उभे केले एवढे मोठे साम्राज्य...