आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan Receives Dada Saheb Phalke Foundation Award

PHOTOS: दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन अवार्डने शाहरुख सन्मानित, स्टेजवर लावले ठुमके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः मंगळवारी मुंबईत दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. 'हॅपी न्यू इयर' या सिनेमासाठी शाहरुखला सन्मानित करण्यात आले. समाजवादी पक्षाचे नेते अमर सिंह यांच्या हस्ते शाहरुखला पुरस्कार प्रदान झाला. यावेळी शाहरुखने अमर सिंह यांच्यासोबत स्टेजवर ठुमके लावले.
सोहळ्यात अनिल कपूर, विवेक ओबरॉय, टाइगर श्रॉफ, जया प्रदा आणि पंकज उदास, हुमा कुरैशी यांचासुद्धा यावेळी या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तर दिग्दर्शक सावन कुमार यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या अवॉर्ड सोहळ्यात बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. हुमा कुरैशी, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, राज कुमार राव, जॅकी भगनानी यांच्यासह कॉमेडियन भारती सिंह, रवी दुबे, रुबीना दिलाइक हे स्टार्स या सोहळ्यात पोहोचले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन अवॉर्ड्स सोहळ्यात पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...