आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख 'ग्लोबल डाइव्हर्सिटी' पुरस्काराने सन्मानित, पाहा लंडनमधील Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्पीकर राइट हॉन जॉन बर्कोवमध्ये घेताना शाहरुख खान)
लंडन: बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरुख खानला ग्लोबल डाइव्हर्सिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार त्याला 4 ऑक्टोबर रोजी ब्रिटीशच्या हाउस ऑफ कॉमनमध्ये देण्यात आला आहे. शाहरुखला हा पुरस्कार संसदेचे 136वे सभापती एमपी राइट हॉन जॉ बर्कोव यांनी दिला. शाहरुखला हा पुरस्कार त्याला सिनेमांत उत्कृष्ट योगदान आणि जगभरात लोकप्रियता मिळवण्यासाठी देण्यात आला आहे. या निमित्त सेरेमनीमध्ये संसदेचे दोन्ही हाऊस कॉमन आणि लॉर्ड्सचे सदस्य उपस्थित होते. शाहरुखने हा पुरस्कार मिळाल्यानंतर संसदेचे सभापती हॉन जॉन बर्कोवा यांचे आभार मानले.
शाहरुखने टि्वटरवर लिहिले, 'मी आता हाउस ऑफ पार्लामेन्टमध्ये ग्लोबल डाइव्हर्सिटी पुरस्कार घेण्यासाठी आलो आहे. खूप आनंदी आहे आणि मला गर्व होत आहे. धन्यवाद...मिस्टर स्पीकर राइट हॉन जॉन बर्कोव आणि माझे मित्र केथ वाज यांचे आभार व्यक्त करतो, कारण ग्लोबल डाइव्हर्सिटी अवॉर्डसाठी शानदार सेरेमनीचे आयोजन केले.'
शाहरुखपूर्वी जॅकी चैन (इंटरनॅशनल फिल्म स्टार), अमिताभ बच्चन (बॉलिवूड महानायक), शेख हसीना (बांग्लादेशचे पंतप्रधान), ऐश्वर्या राय बच्चन (माजी मिस वर्ल्ड), लुईस हेमिल्टन (फॉर्मुला वन रेसिंग वर्ल्ड चॅम्पिअन) आणि रेव्ह जेस जॅक्सन (माजी यूएस राष्ट्रपतिपदाचे उमेदवार) यांनासुध्दा ग्लोबल डाइव्हर्सिटी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ग्लोबल डाइव्हर्सिटी अवॉर्डसाठी लंडनला पोहोचलेल्या शाहरुखची छायाचित्रे...