मुंबई- शाहरुख खान सध्या 'फॅन' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. मंगळवारी (9 डिसेंबर) त्याला मुंबईमधील
आपला बंगला 'मन्नत'च्या बाहेर शूटिंग करताना पाहिल्या गेले.
जो सीन चित्रीत करण्यात येत होतो, की त्यामध्ये शाहरुख मन्नतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. मात्र सिक्युरिटी गार्डने त्याला मध्ये जाण्यास अडवले. त्याने ब्लू चेक्स शर्ट आणि ब्लॅक जीन्स परिधान केलेली होती. त्याच्या हातात एक बॅग होती. सिनेमात शाहरुख चाहत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा मनीष शर्मा दिग्दर्शित करत असून आदित्य चोप्रा निर्मित करत आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होणारा हा सिनेमा 14 ऑगस्ट 2015 रोजी रिलीज होत आहे.
शाहरुखने या सिनेमाविषयी सांगितले, 'मला वाटते, की एक अभिनेता म्हणून मी हॅपी न्यू इअर हा मोठा सिनेमा दिला आहे. आता एक कमर्शिअल सिनेमा करण्याची माझी इच्छा आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शूटिंगदरम्यानची शाहरुख छायाचित्रे...