शाहरुख खानला आपल्या चित्रपटांचा प्रचार-प्रसार करण्यामध्ये तरबेज आहे. खासकरुन बॉलिवूडमधील तीन खानमध्ये (शाहरुख, सलमान आणि आमिर) स्पर्धा असेल त्यावेळी.
सलमान खानचा 'किक' जुलैमध्ये प्रदर्शित होण्याचे निश्चित आहे. शिवाय आमिरचा 'पीके' डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या दोन चित्रपटांच्या मध्यात शाहरुखचा फराह खान दिग्दर्शित 'हॅप्पी न्यू इयर' प्रदर्शित होतोय.
'हॅप्पी न्यू इयर'ला ब्लॉकबस्टर करण्यासाठी शाहरुख हरतर्हेचे प्रयत्न करण्यामध्ये गुंतला आहे. सर्वप्रथम त्याने चित्रपटाच्या प्रचार अभियानाचे डिझायन तयार केले आहे. किंग खानने चित्रपटाच्या सर्व कलाकारांना ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पूर्णपणे फ्री राहण्यास सांगितले आहे. यादरम्यान ते कोणताही अन्य चित्रपट साइन अथवा शूट करणार नाहीत. शाहरुख या दोन महिन्यांच्या कालावधीत कॅनडा आणि अमेरिकेतील विविध शहरांमध्ये रोड शो आयोजित करणार आहे. यामध्ये चित्रपटातील कलावंत नृत्य सादरीकरणाच्या माध्यमातून चाहत्यांचे चित्रपटाकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.